• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

थोड्या कालावधीत मोठ्या प्रमाणात औषधांची उपलब्धता / उत्पादन वाढविण्यासाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (ईआयए) अधिसूचना 2006 मध्ये प्रमुख सुधारणा


सुमारे दोन आठवड्यांच्या कालावधीत यासंबंधीचे 100 हून अधिक प्रस्ताव प्राप्त

Posted On: 15 APR 2020 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2020

 

नोवेल कोरोना विषाणूच्या (COVID-19) जागतिक उद्रेकातून उद्‌भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि विविध औषधांची उपलब्धता, किंवा उत्पादन वाढविण्यासाठी 27 मार्च 2020 रोजी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (ईआयए) अधिसूचना 2006 मध्ये सुधारणा केली.

विविध आजारांवरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणावरील औषध निर्मिती आणि मध्यस्थांच्या संदर्भात सर्व प्रकल्प किंवा उपक्रम विद्यमान श्रेणी '' ते 'बी 2' श्रेणीत पुन्हा वर्गीकृत केले गेले आहेत.

श्रेणी बी 2 अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना मूलभूत माहिती गोळा करणे, ईआयए अभ्यास आणि सार्वजनिक सल्लामसलत आवश्यक आहे. राज्य स्तरावरील मूल्यांकनाचे विकेंद्रीकरण सुलभ व्हावे म्हणून अशा  प्रस्तावांचे पुन्हा वर्गीकरण करण्यात आले आहे; जेणेकरून प्रक्रियेचा वेग वाढू शकेल. देशातील महत्वाची औषधे / औषधांची उपलब्धता कमी कालावधीत वाढविण्यात मदत करण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले आहे. ही दुरुस्ती 30 सप्टेंबर 2020 पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांना लागू आहे. अशा प्रस्तावांवर जलदगतीने प्रक्रिया करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता प्रत्यक्ष बैठक घेऊन प्रस्तावांचे मूल्यांकन करणे शक्य होणार नाही म्हणून दिलेले प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्ससारख्या  माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला मंत्रालयाने राज्यांना दिला आहे.

सुमारे दोन आठवड्यांच्या कालावधीत या श्रेणीअंतर्गत 100 हून अधिक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, जे राज्यातील संबंधित नियामक प्राधिकरणांकडून निर्णय घेण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1614862) Visitor Counter : 259


Link mygov.in