PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
लॉकडाऊन केले नसते तर 15 एप्रिलपर्यंत देशात कोरोनाचे 1.2 लाख रुग्ण असते: आरोग्य मंत्रालय सार्वजनिक क्षेत्रात 3.28 कोटी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन च्या गोळ्या उपलब्ध आहेत तर खाजगी क्षेत्रात 2.65 कोटी गोळ्या उपलब्ध : आरोग्य मंत्रालय
Posted On:
11 APR 2020 8:10PM by PIB Mumbai
Delhi-Mumbai, April 11, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड -19 चा सामना करण्यासाठी रणनीती आखण्याबाबत आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांबरोबर साधलेला हा तिसरा संवाद आहे, यापूर्वीचा संवाद 2 एप्रिल आणि 20 मार्च 2020 रोजी झाला होता. पंतप्रधान म्हणाले की केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोविड -19 चा परिणाम कमी होण्यात नक्कीच मदत झाली आहे , परंतु परिस्थिती वेगाने बदलत असल्यामुळे सतत दक्षता घेणे अतिशय गरजेचे आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा परिणाम जाणून घेण्यासाठी पुढील 3-4 आठवडे अतिशय महत्वाचे असल्यावर त्यांनी भर दिला
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवर पत्रकार परिषद
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.
- केंद्रीय गृहमंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत लॉकडाऊनच्या मार्गदर्शन तत्वांचे परिशिष्ठ जारी केले आहे, यानुसार, सागरी मासेमारी, जलचर उद्योग, आणि यातील कामगारांना लॉकडाऊन च्या नियमातून सवलत देण्यात आली आहे.
- फिडिंग, मेंटेनन्स, तयार पिकांची कापणी, प्रक्रिया, पॅकेजिंग, कोल्ड चेन, विक्री आणि पणन या क्षेत्रातील कामकाजाला आता परवानगी देण्यात येईल
- सामाजिक अंतर आणि स्वच्छतेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी संबंधित संस्थांचे प्रमुखांची असेल आणि या मार्गदर्शन तत्वांची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल
- रुग्णांची तपासणी करताना आणि विलगीकरण केंद्रामध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची सूचना करण्यासाठी गृह मंत्रालयाने पुन्हा एकदा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे
- जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा समाधानकारक असून त्यावर प्रत्येक स्तरावर देखरेख ठेवली जात आहे
- कोविड-19 विरोधातील लढ्यात सेवा करण्यासाठी NCC आणि NSS चे छात्र आणि नागरी सेवा स्वयंसेवक पुढे आले आहेत
- कोविड19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल देखील शर्थीचे प्रयत्न करत आहे.त्यासाठी समुदाय जागृती, विलगीकरण कक्षांची स्थापना आणि अडकलेल्या मजुरांना अन्नपुरवठा ही कामे केली जात आहेत.
- आतापर्यंत आम्ही 1,71,718 नमुन्यांच्या चाचण्या केल्या आहेत. काल 16,564 चाचण्या करण्यात आल्या. आयसीएमआर नेटवर्क च्या 146 प्रयोगशाळा आहेत तर 67 खाजगी प्रयोगशाळा देशात आहेत
- भारत सरकारने या आपत्तीला तोंड देण्यासाठी खूपच आधीपासून तयारी ठेवली होती आणि या उपाययोजना प्रतिबंधक आणि त्वरेने केलेल्या होत्या; आमच्या नियोजनबद्ध उपाययोजनामुळे आम्ही या परिस्थितीला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकलो
- राज्यांशी समन्वय साधत केंद्र सरकार, आवश्यकतेनुसार PPE, N95 मास्क, चाचणी किट्स आणि व्हेंटिलेटर्स चा पुरवठा करत आहे. कोविडवर संपूर्ण उपचार करणे आणि विषाणूंचा संसर्ग रोखणे यासाठी समर्पित रुग्णालयेही तयार केली जात आहेत
- आतापर्यंत देशात 586 समर्पित कोविड रुग्णालये स्थापन करण्यात आली असून त्यांची क्षमता 1 लाख अलगीकरण खाटा आणि सुमारे 11, 500 अतिदक्षता खाटा, इतकी आहे. जसजशी परिस्थिती बदलते आहे, तसतसे हे आकडेही वाढवले जात आहेत.
- आयुष मंत्रालयाने श्वसन विषयक आरोग्यासाठी आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच तयार केला आहे, जिल्हास्तरीय आकस्मिक योजनांमध्येही यांचा अवलंब करण्याच्या सूचना जिल्ह्यांना दिल्या आहेत
- कोविड-19 च्या रुग्णांसाठी परिबंधित धोरण( कंटेंनमेंट पॉलिसी), कृती आराखडा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि वैद्यकीय व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, योग्य प्रक्रियेनुसार आणि राज्यांशी समन्वय साधून हे धोरण राबवले जात आहे.
- पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांची बैठक घेतली, यामध्ये प्रत्येकानेच #COVID19 महामारी पासून आपला बचाव करण्यासाठी कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही कामात एकजुटीने झोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला
- आज देशात कोविडबधितांची एकूण संख्या 7,447 इतकी आहे 642 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत - 1035 नवे रुग्ण आणि 40 मृत्यू. आतापर्यंत एकूण 239 लोकांचा मृत्यू झाला आहे.
- जर कंटेंनमेंट किंवा देशव्यापी लॉकडाऊन केले नसते तर 15 एप्रिलपर्यंत रुग्णांची वाढ 41% म्हणजे 8.2 लाख रुग्ण इतकी असती. जर केवळ कंटेंनमेन्ट आहे आणि लॉकडाऊन नाही अशा स्थितीत 15 एप्रिलपर्यंत 1.2 लाख रुग्ण असते वेळीच उपाययोजना केल्यामुळे आज रुग्णसंख्या 7,447 एवढी आहे.
- आग्र्याच्या कोविड19 क्लस्टर संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी अगदी सुरुवातीपासून एकत्रित प्रयत्न केले गेले. सक्रिय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग,रुग्णांचे अलगीकरण, खाजगी क्षेत्रांच्या मदतीने वैद्यकीय क्षमतेत वाढ, अन्न आणि इतर वस्तूंचा पुरवठा, नागरिकांचा सहभाग
- संपर्कातून संसर्ग झालेल्या व्यक्तींचा सविस्तर माग ठेवण्यात आला आणि त्याचे अपिकेंद्र आणि हॉट स्पॉट्स नकाशावर निश्चित करण्यात आले. आग्र्यातील कोविड-19 समूहात प्रतिबंधात्मक कारवाई बाबत - आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
- हॉट स्पॉट्स आणि केंद्र निश्चित केल्यानंतर, 1248 विशेष टिम्स तयार करण्यात आल्या, ज्यांनी घरोघरी जाऊन 9.3 लाख लोकांचे आरोग्य सर्वेक्षण केले, त्यानुसार लक्षणांवर आधारित 2,500 रुग्ण वेगळे करण्यात आले असून त्यांच्यावर देखरेख ठेवली.
- समन्वयीत प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आग्रा स्मार्ट सिटी कंट्रोल रूम चे रूपांतर कोविड-19 च्या विरोधात लढण्यासाठी वॉर रुम मध्ये करण्यात आले, केंद्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आणि विशेष पथके स्थापन करण्यात आली
- जिल्हा प्रशासनाने देखील लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काम केले.तसंच, अलगीकरण कक्ष स्थापन करणे , वैद्यकीय सेवा पुरवणे, यासाठी खाजगी- सरकारी भागीदारीचा उपयोग करण्यात आला.
- कोविड19 चा सामना करण्यासाठी आग्रा जिल्हा प्रशासनाने इतर उपाययोजना देखील केल्या. वितरण साखळी व्यवस्थापन, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, बेघर आणि गरजू लोकांना अन्न आणि निवारा, पशूंसाठी चारा, नागरिकांसाठी मदत व हेल्पलाईन सुरु करणे, अशा उपाययोजनांचा समावेश आहे.
- आग्रा जिल्ह्यात असलेल्या एकूण 92 पॉसिटीव्ह रुग्णांपैकी 5 जण पूर्ण बरे झाले, 87 लोकांवर रुग्णलयात उपचार सुरु आहेत, आणि त्यांच्यापैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नाही
- रॅपिड अँटीबॉडी आधारित ब्लड टेस्टचे लाभ - कोविड19 किती दूरवर पसरला तसेच त्याची पद्धत काय ते शोधून काढणे आणि हॉट स्पॉटमध्ये कंटेनमेंट उपाययोजनांचे यश तपासणे आरोग्य कर्मचारी कोविड19च्या संसर्गाला इम्युन झाले आहेत का, ते तपासणे, आणि त्यानुसार त्यांना कामावर पाठवणे
- सध्या सार्वजनिक क्षेत्रात 3.28 कोटी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन च्या गोळ्या उपलब्ध आहेत, खाजगी क्षेत्रात 2.65 कोटी गोळ्या आहेत.त्या शिवाय, आणखी 2 कोटी गोळ्या खरेदी करुन त्या खाजगी रुग्णालयांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे-
वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Other updates:
महाराष्ट्र अपडेट्स
***
DJM/RT/MC/SP/PK
(Release ID: 1613430)
|