विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

डीएसटीद्वारे अनुदानित स्टार्ट अपकडून लक्षणरहित कोविड-19 संसर्गा चाचणी संच विकसित; लस निर्मितीसाठीही सज्ज

Posted On: 11 APR 2020 4:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020

 

सीगल बायो सोल्युशन ही नवीन जैविक तंत्रज्ञानावर काम करणारी स्टार्ट अप कंपनी असून, कोविड-19 आपत्कालीन परिस्थितीसाठी रोगप्रतिकारक तपासणी संच आणि क्रियाशील व्हायरोजोम (एव्ही) – लस विकसित करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग अर्थसहाय्य करीत आहे. 

सीगल बायोद्वारे विकसित क्रियाशील व्हायरोसोम (एव्हीटी) तंत्रज्ञान हे लस आणि रोगप्रतिकारक एजंट्सच्या उत्पादनासाठी उपयुक्त आहे. एव्हीटी व्यासपीठ हे लक्षित रोगजनाकांद्वारे इच्छित प्रतीजन दर्शविणाऱ्या नवीन, विना-घातक आणि किफायतशीर क्रियाशील व्हायरोसोमच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे. याचा उपयोग कोविड-19 संसर्गाच्या प्रतिबंधासाठी नवीन लस तयार करण्यासाठी आणि कोविड-19 साठी इम्यूनोडायग्नोस्टिक एलिसा संच विकसित करण्यासाठी केला जाईल.

अचूक निदान, संक्रमणाची साखळी खंडीत करणे, उपचार तसेच सुरक्षित आणि प्रभावी लसींचा प्रतिबंधात्मक उपाय हे कोविड-19 च्या आव्हानांना सामोरे जातानाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. यापैकी, लस विकसित करणे हा दीर्घकालीन घटनाक्रम आहे आणि म्हणूनच आता त्या कामाचा वेगाने पाठपुरावा करणे आवश्यक आहे”. असे मत डीएसटीचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केले. 

पॉलीमरेज शृंखला प्रतिक्रिया (पीसीआर) – आधारित निदान संच जे सध्या भारतात उपलब्ध आहेत ते सक्रीय कोविड-19 संसर्गाची तपासणी जलदरित्या करण्यासाठी सक्षम आहेत परंतु लक्षणरहित संसर्ग किंवा ज्यांना पूर्वी कोविड-19 चा संसर्ग झाला होता आणि हा आजार झाला नव्हता किंवा कोविड-19 आजारातून बरे झाले आहेत आणि जे अजूनही त्याचा प्रसार करत आहेत अशा लोकांची ओळख पटवू शकत नाहीत. याउलट, इम्यूनोडायग्नोस्टिक संच कोविडला रोग-प्रतिकारक शोधण्यात मदत करतात - जे या संक्रमणांना देखील ओळखू शकतात. म्हणूनच एसबीपीएलने कोविड-19 साठी इम्यूनोडायग्नोस्टिक संच तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या चाचण्यांमुळे आरोग्य सेवा संशोधक अधिक सक्षमपणे कोविड-19 च्या प्रसाराचे अचूक परीक्षण करतील.

Description: DST-Publication-picture

सीगल हे पुणे येथील उद्योजकता विकास केंद्राचे जैव आधारित स्टार्ट अप असून तंत्रज्ञान विकास मंडळाच्या (टीडीबी) आर्थिक सहाय्य व्यवस्थे अंतर्गत त्याला पाठबळ दिले जाते, डीएसटी दोन प्रकारचे क्रियाशील व्हायरोसोम एजंट तयार करीत आहे. एसबीपीएल दोन प्रकारचे एव्ही एजंट तयार करेल - एक कोविड-19 (एव्ही-एस) चे एस प्रथिन आणि दुसरे एक कोविड-19 (एव्ही-एसपी) चे धोरणात्मक प्रथिने व्यक्त करेल. एसबीपीएल सध्या या दोन्ही एजंट्सचे संश्लेषण 10 मिलीग्राम पातळीपर्यंत वाढवित आहे जेणेकरुन त्यांची रोग-प्रतिकारक चाचणी घेता येईल. ही चाचणी सर्वप्रथम एव्ही-एस आणि एव्ही-एसपीची क्षमता शोधण्यासाठी वन्य प्रकारातील उंदरांमध्ये केली जाईल.

इम्यूनोडायग्नोस्टिक संच ऑगस्ट 2020 च्या अखेरीस चाचण्यांसाठी तयार होतील आणि 10-11 महिन्यांच्या अखेरीस त्याला मंजुरी मिळेल, अशी एसबीपीएलला आशा आहे. दुसरीकडे,एव्ही लस तयार व्हायला जास्त वेळ लागेल. तथापि, आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता या संकल्पनेचे पुरावे 80 दिवसात पूर्ण करण्याचे आणि 18 ते 20 महिन्यांच्या अखेरीपर्यंत पूर्व चिकित्सा विकास पूर्ण करणे आणि फेज 1ची चाचणी सुरु करण्याचे एसबीपीएलचे उद्दीष्ट आहे.

(अधिक माहितीसाठी संपर्क: विश्वास डी. जोशी vishwasjo@seagullbiosolutions.in मोबाईल: 9967547936)

 

U.Ujgare/S.Mhatre/P.Kor



(Release ID: 1613311) Visitor Counter : 296