आयुष मंत्रालय
होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी टेलिमेडिसिन मार्गदर्शकतत्त्वे मंजूर
आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी जागतिक होमिओपॅथि दिनी आंतराष्ट्रीय वेबिनारचे केले उद्घाटन
Posted On:
11 APR 2020 1:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020
होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांच्या 265 व्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिनी 10 एप्रिल 2020 रोजी आयुष मंत्रालया अंतर्गत होमिओपॅथीसाठी केंद्रीय संशोधन परिषदे (सीसीआरएच) द्वारे आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला होता. डिजिटल व्यासपिठावर थेट प्रक्षेपण करण्यात आलेल्या या वेबीनार मध्ये हजारोंच्या संख्येने संबधित सहभागी झाले होते. राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद येसो नाईक यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी टेलिमेडिसिन मार्गदर्शकतत्त्वे मंजूर झाल्याची घोषणा केली तसेच गरज भासल्यास आयुष कार्यदलाने कोविड कृती दलाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यसाठी एकत्र यावे यावर जोर दिला. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. प्रोफेसर (डॉ.) जॉर्ज विठौलकास, संचालक,इंटरनेशनल अकॅडमी ऑफ क्लासिकल होमिओपॅथी, गीस, डॉ अनिल खुराना, डीजी (स्वतंत्र प्रभार), सीसीआरएच, डॉ. आर के मंचांडा, संचालक होमिओपॅथी, आयुष विभाग, दिल्ली सरकार, डॉ. आर के मंचांडा, संचालक होमिओपॅथी, आयुष विभाग, दिल्ली सरकार, आयुष मंत्रालयाचे संचालक डॉ. एस. के. विद्यार्थी, डॉ. व्ही के. गुप्ता, भारत, डॉ. रॉबर्ट व्हॅन हसेलेन, ब्रिटन, प्रा. अॅरोन तो, हाँगकाँग, हे या वेबीनारचे प्रमुख वक्ते होते. बहुतेक वक्त्यांनी यावेळी कोविड-19 वर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या उपायांमध्ये होमिओपॅथीच्या संभाव्य शक्यतांबद्द्ल आपली मते मांडली तसेच कोविड रुग्णांच्या प्रमाणित काळजी घेण्यासोबतच होमिओपॅथीचा सहाय्यक उपयोग करण्याबाबत तथ्य सादर केली.
B.Gokhale/ S.Mhatre/P.Kor
(Release ID: 1613247)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam