आदिवासी विकास मंत्रालय

कोरोना विषाणूपासून सुरक्षिततेसाठी ट्रायफेडचे कारागिर, बचत गट, वन धन योजनेचे लाभार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनी बनवलेल्या मास्कचा पुरवठा करण्याचा ट्रायफेडचा प्रस्ताव

Posted On: 11 APR 2020 3:47PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020

 

केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्था TRIFED (Tribal Cooperative Marketing Development Federation of India) म्हणजेच भारतीय आदिवासी सहकारी पणन विकास महामंडळ आदिवासी कारागीर, बचत गट, वन धन योजनेचे लाभार्थी आणि स्वयंसेवी संस्था यांच्यासोबत सातत्याने विविध कामे करत असते, यात हातमाग, हस्त कौशल्याच्या वस्तू आणि इतर नैसर्गिक उत्पादन निर्मिती आणि विक्रीच्या कामांचा समावेश आहे. सध्या देशात कोरोनाचा संसर्ग पसरत असतांना यापेकी काही पुरवठादारांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या समुदायातील लोकांच्या संरक्षणासाठी  घरच्या घरी मास्क बनवण्याचे काम सुरु केले आहे. त्यापेकी काही लोक स्थानिक स्वराज्य संस्थांनाही मास्कचा पुरवठा करत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना देशातल्या जनतेला गरज असल्यास, आणखी मास्कचा पुरवठा करण्यास तयार असल्याचे या सर्वांनी सरकारला कळवले आहे. या मास्कच्या पुरवठ्यामुळे या कारागिरांना आणि बचत गटांना घरच्या घरी रोजगाराचे साधन मिळेल आणि मास्क्ची उपलब्धताही वाढेल. हेच लक्षात घेत, TRIFED अशा आणखी पुरवठादारांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

सध्या देशात सगळीकडे कोविडचा धोका वाढतो आहे. जवळपास सर्वच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात याचा प्रादुर्भाव झाला असून समाजातल्या प्रत्येक थरात या आजाराचा संसर्ग वाढतो आहे. विशेषतः गरीब आणि वंचित लोकांना या साथीचा मोठा फटका बसला आहे. सध्या शेतीत कापणीचा आणि जंगलातील वनउत्पादने गोळा करण्याचा हंगामा सुरु आहे. अशा काळात, कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी विशेष काळजी घेणा आवश्यक आहे. त्यासाठी घरात बनवलेले मास्क लावता येतील.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1613303) Visitor Counter : 212