माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माहिती आणि प्रसारण मंत्रालय व त्याच्या माध्यम विभागांमध्ये विशेष मोहीम 5.0 जोमात सुरू

Posted On: 22 OCT 2025 3:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2025

 

स्वच्छतेला संस्थात्मक स्वरूप देणे, प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करणे, या उद्देशाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयात विशेष मोहिम 5.0 जोमाने राबविली जात आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह  त्याचे माध्यम विभाग व देशभरातील क्षेत्रीय कार्यालये या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होत असून, कार्यस्थळी स्वच्छता, प्रलंबित कामांचा निपटारा व कार्यक्षमतेत वाढ यावर भर दिला जात आहे.

मोहिमेच्या 2 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2025 या पहिल्या पंधरवड्यातील प्रमुख कामगिरी पुढीलप्रमाणे आहे:

  • मंत्रालयाने 493 मोहिमा राबवून 973 ठिकाणे स्वच्छ केली आहेत, तसेच 104 वाहने निष्कासित करण्यात आली आहेत.
  • सुमारे 1.43 लाख किलोग्रॅम भंगार नष्ट करण्यात आले असून त्यातून  34.27 लाख रुपये उत्पन्न मिळाले  आणि 8007 चौरस फूट जागा मोकळी झालीे.
  • सुमारे 13,900 नस्तींचे पुनरावलोकन करण्यात आले असून त्यापैकी 3957 नस्ती निकाली काढण्यात आल्या आहेत. एकूण 585 ई-नस्तींचे पुनरावलोकन झाले असून त्यापैकी 165 निकालात काढल्या आहेत.
  • 301 सार्वजनिक तक्रारी, 57 पीजी अपील, 16 खासदार संदर्भ, दोन राज्य सरकार संदर्भ व एक पंतप्रधान कार्यालयाचा संदर्भ असलेली प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत, याशिवाय अन्य कामगिरीही पार पडली आहे.

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे एक पथक विशेष मोहिम 5.0 अंतर्गत विविध कार्यवाह्यांची प्रगती पाहण्यासाठी देशभरातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पाठवण्यात आले आहेत .

मंत्रालय कार्यस्थळी वाढीव स्वच्छता, कार्यक्षमतेत वृद्धी, स्वच्छतेला संस्थात्मक स्वरूप देणे, प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा व जबाबदारीने ई-कचरा व्यवस्थापन या उद्दिष्टांप्रती कटिबद्ध असून, देशाच्या स्वच्छता व शाश्वततेच्या प्रयत्नात योगदान देत आहे. 

  

Sanitation drive in a school under Special Campaign 5.0 by PIB Imphal to promote hygiene and community spirit.

   

R. K. Jena, Sr. Economic Adviser and the Nodal Officer of Ministry of I&B inspected cleanliness and work of digitisation and weeding out files in Record Room and different Section of the Ministry at Shastri Bhawan.

 

* * *

सुषमा काणे/रेश्‍मा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2181548) Visitor Counter : 11