PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 10 DEC 2020 7:30PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 10 डिसेंबर 2020

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

Image

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी झाली. ही इमारत, देशाच्याआत्मनिर्भर भारतदूरदृष्टीचा अविभाज्य घटक ठरणार असून या रूपाने, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला जनतेची संसद उभारण्याची एक महत्वाची संधी मिळणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतांना म्हणजेच 2022 मध्ये या इमारतीतनव भारताच्या इच्छाआकांक्षांचे अनुरूप प्रतिबिंब त्यात असेल.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

भारताच्या चाचण्यांमध्ये वेगवान वाढ; एकूण चाचण्यांची संख्या 15 कोटीच्या पुढे; गेल्या 10 दिवसात 1 कोटी चाचण्या-

जागतिक महामारीच्या विरूद्ध लढ्यात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. चाचण्यांची एकूण संख्या 15 कोटीच्या पुढे गेली आहे.

गेल्या 24 तासांत 9,22,959 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, त्यामुळे भारताची चाचण्यांची एकूण संख्या वाढून 15,07,59,726 झाली आहे.

शेवटच्या एक कोटी चाचण्या केवळ 10 दिवसात करण्यात आल्या. सातत्याने सर्वसमावेशक आणि व्यापक चाचण्या केल्यामुळे सकारात्मकता दर खाली आला आहे.

महाराष्ट्रात काल 5,051 रुग्ण बरे झाले तर केरळमध्ये 4,647 आणि दिल्लीत 4,177 रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 4,981. नवे रुग्ण आढळून आले, तर केरळमध्ये 4,875 आणि पश्चिम बंगालमध्ये 2,956 नवे रुग्ण आढळून आले

डॉ. हर्ष वर्धन यांनी 6 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 चा भाग म्हणून आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन ट्रायबल हेल्थ, जबलपूर द्वारा आयोजित व्हर्चुअल कर्टन रेझर सोहळ्याला डिजिटली संबोधित केले-

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भू विज्ञान मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी जबलपूर येथे 6 व्या आंतरराष्ट्रीय महोत्सव 2020 चा भाग म्हणून आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन ट्रायबल हेल्थ द्वारा आयोजित व्हर्च्युअल कर्टन रेझर सोहळ्याला डिजिटली संबोधित केले.

इतर अपडेट्स:

थावरचंद गेहलोत यांनी महाराष्ट्रातील लातूरच्या 8797 दिव्यांगजनांना मदत आणि सहाय्यक उपकरणे पुरवणाऱ्या एडीआयपी शिबिराचे ई-उद्घाटन केले- केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी आज ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंगच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या एडीआयपी योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील निवडक दिव्यांगजनांसाठी सहाय्यक साधने आणि उपकरणाच्या मोफत वितरणासाठी एडीआयपीच्या शिबिराचे ई-उद्घाटन केले.

भारतीय टपाल विभागाने मानवी हक्क दिनानिमित्त विशेष लिफाफा प्रकाशित केला-भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळाने आज 10 डिसेंबर 2020 रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त 'मानवाधिकार' वर विशेष लिफाफा मुंबईत प्रकाशित केला. या उपक्रमाचा उद्देश जनजागृती करणे आणि समानता, सहकार्य, शांतता आणि लोकांमध्ये वैश्विक आदर सुनिश्चित करणे हा आहे.

5.56 x 30 मिमी जॉइंट व्हेंचर प्रोटेक्टिव कार्बाइनची यशस्वी चाचणी- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डिआरडीओ) विकसित केलेल्या 5.56x30 मिमी संरक्षणात्मक कार्बाइनची 7 डिसेंबर 2020 रोजी जनरल स्टाफ गुणात्मक आवश्यकतांच्या सर्व निकषांसह यशस्वी चाचणी केली आली. यामुळे याचा सेवेत समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बिहारमधील सोन नदीवर 266 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या कोईलवार पुलाचे गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील सोन नदीवरील 1.5 कि.मी. लांबीच्या तीन पदरी कोईलवार पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पुलाच्या बांधकामासाठी 266 कोटी रुपये खर्च झाले आहेत. रेल्वे आणि रस्ता वाहतुकीसाठी सध्या अस्तित्वात असलेला दोन पदरी पूल 138 वर्ष जुना आहे. त्याच्या जागी सहा पदरी पूल बांधण्यात येत असून त्यापैकी तीन पदरी कॅरेज वे जनतेसाठी खुला करण्यात आला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आसियान संरक्षण मंत्र्यांच्या मिटिंग प्लसला ऑनलाईन संबोधित केले-एडीएमएम प्लस ही 10 आसियान देशांच्या आणि आठ भागीदार देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक आहे. हे वर्ष एडीएमएम प्लस फोरमच्या स्थापनेचे दहावे वर्ष आहे. त्यानिमित्त आयोजित विशेष सोहळ्याला व्हिएतनामचे पंतप्रधान गुयेन झुआन फुक उपस्थित होते आणि या सोहळ्याला संबोधित करण्याचा बहुमान राजनाथ सिंह यांना मिळाला ज्यातून या मंचाने भारताला दिलेली मान्यता प्रतिबिबित होते.

 

महाराष्ट्र अपडेट्स:

महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी माहिती दिली की, को-विन पोर्टवलर 16,000 पेक्षा अधिक व्यक्तींनी लसीकरणासाठी तर सुमारे एक लाख व्यक्तींनी लाभार्थी म्हणून नोंद केली आहे. कोविड लसीकरणासंबंधी राज्याच्या तयारीविषयी तपशीलवार सादरीकरण करताना, व्यास यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालाली सुकाणू समितीला सांगितले की, सध्या 3,135 केंद्रावर शीतगृह साठा साखळी सुविधा उपलब्ध आहे आणि राज्यभर विविध ठिकाणी लशीची वाहतूक करता येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी दवाखान्यांमध्ये लसीकरण बुथ उभारले जातील. नंतरच्या टप्प्यात, अशाप्रकारचे बुथ शाळा, सामुदायिक सभागृह आणि शासकीय कार्यालयांमध्ये उभा करुन आघाडीवरील कर्मचारी, जसे पोलीस, अत्यावश्यक सेवा पुरवठादार, 50 वर्षांपुढील नागरीक आणि जुनाट आजार असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येईल. दरम्यान, महाराष्ट्र सायबर सेलने मार्गदर्शिका प्रसिद्ध केली असून यात कोविड-19 लसीच्या उपलब्धतेविषयी सायबर गुन्हे घडवण्याचा इंटरपोलने दिलेल्या इशाऱ्याविषयी माहिती देण्यात आली आहे. राज्य सायबर सेलने अधोरेखीत केले आहे की, संघटनात्मक गुन्हेगारी नेटवर्क लस पुरवठा साखळीला लक्ष्य करुन अवैध आणि बनावट उत्पादनांविषयी अनेक बनावट संकेतस्थळांची निर्मिती करु शकतात.  

FACT CHECK

 

 

 

 

 

Image

 

Image

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1679767) Visitor Counter : 288