संरक्षण मंत्रालय

5.56 x 30 मिमी जॉइंट व्हेंचर प्रोटेक्टिव कार्बाइनची यशस्वी चाचणी

Posted On: 10 DEC 2020 5:39PM by PIB Mumbai

 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डिआरडीओ) विकसित केलेल्या 5.56x30 मिमी संरक्षणात्मक कार्बाइनची 7 डिसेंबर 2020 रोजी जनरल स्टाफ गुणात्मक आवश्यकतांच्या सर्व निकषांसह यशस्वी चाचणी करण्यात आली. यामुळे याचा सेवेत समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उन्हाळ्यात कडक तापमानात आणि हिवाळ्यातील उच्च उंचीवर चालणार्‍या वापरकर्त्याच्या चाचण्यांच्या मालिकेतील चाचण्यांचा हा शेवटचा टप्पा होता. डीव्हीक्यूएमार्फत घेण्यात आलेल्या गुणवत्ता चाचण्या व्यतिरिक्त जेव्हीपीसीने विश्वासार्हता आणि अचूकतेचे कठोर कामगिरीविषयक निकष यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. 

जेव्हीपीसी गॅसवर संचलित बल-पप स्वयंचलित शस्त्रासारखे आहे, ज्याचा गोळीबारीचा वेग 700 राऊंड प्रति मिनिट एवढा आहे. कार्बाइनची प्रभावी कक्षा 100 मीटरपेक्षा अधिक आहे आणि वजन सुमारे 3.0 किलो आहे. ज्याची उच्च विश्वसनीयता, मागे सरण्याचे कमी प्रमाण, मागे घेण्यायोग्य बट, सुविधायुक्त रचना, एका हाताने गोळीबार करण्याची क्षमता आणि बहुविध पिकाटिनी रेल ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये सुरक्षा संस्थांद्वारे विद्रोह/दहशतवादविरोधी ऑपरेशनसाठी अतिशय शक्तिशाली शस्त्र ठरवतात.            

कार्बाइनची रचना पुणेस्थित डिआरडिओची प्रयोगशाळा शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापनाने (ARDE) सैन्यदलाच्या जीएसक्युआरनुसार केली आहे. तर शस्त्रनिर्मिती लघु शस्त्र कारखाना, कानपूर येथे आणि बंदुकीच्या गोळ्यांची (दारुगोळा) निर्मिती खडकी, पुणे येथील दारुगोळा कारखान्यात करण्यात आली आहे.

हे शस्त्र यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाच्या चाचण्यांमध्ये यशस्वी झाले आहे आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि विविध राज्यांच्या पोलीस संघटनांनी खरेदीप्रक्रिया सुरु केली आहे.  

संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते लखनौ येथे झालेल्या संरक्षण प्रदर्शनात 5.56 x 30 जेव्हीपीसीचे अनावरण करण्यात आले होते. 

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1679704) Visitor Counter : 353