सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

थावरचंद गेहलोत यांनी  महाराष्ट्रातील लातूरच्या 8797 दिव्यांगजनांना मदत आणि सहाय्यक उपकरणे पुरवणाऱ्या एडीआयपी शिबिराचे ई-उद्घाटन केले

Posted On: 10 DEC 2020 6:49PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी आज ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंगच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या एडीआयपी योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील निवडक  दिव्यांगजनांसाठी सहाय्यक साधने आणि उपकरणाच्या मोफत वितरणासाठी एडीआयपीच्या शिबिराचे ई-उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे होते. राज्यमंत्री संजय बाबूराव बनसोडे, लातूरचे खासदार  सुधाकर तुकाराम शृंगारे गारे,आणि  इतर स्थानिक लोकप्रतिनिधी.उपस्थित होते. तसेच डीईपीडब्ल्यूडीच्या सचिव शकुंतला डी गॅमलिन आणि संयुक्त सचिव  (डीईपीडब्ल्यूडी) डॉ. प्रबोध सेठ व्हर्चुअली  उपस्थित होते.

उद्घाटनपर  भाषण देताना थावरचंद गेहलोत म्हणाले की, कोविड -19 महामारीच्या  परिस्थितीत केंद्र सरकारकडून विशेष उपाययोजना केल्या आहेत जेणेकरून कल्याणकारी योजनेचा लाभ दिव्यांग  व्यक्तींच्या हितासाठी अखंडितपणे चालू राहील. प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करत सहाय्यक साधने आणि उपकरणाच्या मोफत वितरणासाठी आज एडीआयपी शिबिराचे आयोजन महाराष्ट्रातील लातूर येथील जिल्हाधिकारी सभागृहात करण्यात आले . ते म्हणाले की, आपल्या देशात दिव्यांगजनांना मोफत मदत व सहाय्यक उपकरणे उपलब्ध करुन देण्यासाठी 338  कोटी रुपयांच्या खर्चासह ALIMCO अर्थात भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती महामंडळाचे आधुनिकीकरण केले जात आहे. सन 2014-15,पासून, 16,87  लाख लाभार्थ्यांना 1,003.09 कोटी रुपयांची मदत आणि  सहाय्यक उपकरणे देण्यासाठी 9,331  दिव्यांगजनांना मदत आणि सहाय्यक उपकरणे पुरवणारी शिबिरे आयोजित केली गेली आहेत.  637 विशेष शिबिरे आयोजित केली असून  सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण  मंत्रालय देशाच्या सर्व भागांमध्ये अशा  प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहे.

ते म्हणाले की त्यांच्या मंत्रालयाने या एडीआयपी शिबिरांच्या आयोजनातून  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 10 विक्रम नोंदवले आहेत.  आपल्या देशातील  186  रुग्णालयांमध्ये कर्णबधिर मुलांसाठी  कोक्लीयर इम्प्लांट सर्जरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे  आणि आतापर्यंत 2,995  शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. 19,402  यंत्रचलित  ट्रायसिकल्सचे वितरण करण्यात आले

केंद्र  सरकारच्या एडीआयपी योजनेंतर्गत लातूरच्या  जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने  सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने (एमओएसजेई) नवीन मंजूर प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) नुसार शिबीर आयोजित केले.

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1679737) Visitor Counter : 242