रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

बिहारमधील सोन नदीवर  266 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या कोईलवार पुलाचे गडकरी यांच्या हस्ते  उद्घाटन


राज्यातील अनेक नवीन प्रकल्पांची केली घोषणा

Posted On: 10 DEC 2020 6:03PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि  महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील सोन नदीवरील 1.5 कि.मी. लांबीच्या तीन पदरी कोईलवार पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पुलाच्या बांधकामासाठी 266 कोटी रुपये खर्च झाले आहेत. रेल्वे आणि रस्ता वाहतुकीसाठी सध्या अस्तित्वात असलेला दोन पदरी पूल 138  वर्ष जुना आहे. त्याच्या जागी सहा पदरी पूल बांधण्यात येत असून त्यापैकी तीन पदरी कॅरेज वे जनतेसाठी खुला करण्यात आला आहे.  इतर कॅरिज वे पूर्ण झाल्यानंतर एनएच- 922 आणि एनएच- 30 वरील वाहतूक  मोठ्या प्रमाणात सुलभ होईल. हा पूल बिहार आणि उत्तर प्रदेश दरम्यान  वाहतुकीसाठीचा  मुख्य रस्ता आहे.

 बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि स्थानिक खासदार राजीव प्रताप रुडी यांनी प्रस्तावित केल्यानुसार पूर्वांचल एक्सप्रेस वेला जोडण्यासाठी .मंत्रालयाने भारौली (बक्सर) ते हैदरिया पर्यंत चार पदरी उन्नत रस्त्याला मंजुरी दिली आहे.   17 किलोमीटर लांबीच्या या लिंक रोडचा डीपीआर पुढील वर्षी जूनपर्यंत  तयार होईल. मंत्रालयाने 70 किमी लांबीच्या मोकामा-मुंगेर रस्ता रुंदीकरणालाही  मान्यता  दिली असून त्यासाठी येत्या एप्रिलमध्ये डीपीआर पूर्ण होईल. तसेच मुझफ्फपूर - बरौनी रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होईल. खगेरिया-पूर्णिया रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला (एनएच-31१) मान्यता मिळाली असून येत्या एप्रिलमध्ये त्याचा डीपीआर तयार होईल. मुजफ्फरपूर-सीतामढी-सोनेवर्षा रस्त्याचे चौपदरीकरण (एनएच-77)), जे रामजानकी मार्गाचा भाग आहे, ते जणकपूर धाम (नेपाळ) पर्यंतचा प्रवास सुलभ करेल आणि पुढील वर्षी मे महिन्यात त्याचा डीपीआर तयार होईल.

केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी बिहारमधील रस्ते जाळ्यांच्या विकासासाठी पाठविलेल्या प्रस्तावांचा संदर्भही गडकरी यांनी दिला. ते म्हणाले, त्यांच्या सूचना लक्षात घेऊन सासाराम-अराह-पाटणा ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी नवीन संरेखन तयार केले आहे. अराह रिंगरोडवर सध्या अस्तित्त्वात असलेल्या तीन प्रकल्पांत 90 टक्के काम  पूर्ण  होईल, असे ते म्हणाले. केंद्रीय ऊर्जा आणि  नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री  आर. के. सिंह यांनी पुलाच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त केला. बिहारच्या अराह भागातील रस्ते आणि महामार्ग यांचा कायापालट केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. पटना-अराह -सासाराम ग्रीनफिल्ड प्रकल्प पाटणा अराह-बक्सर रोडला जोडण्यासाठी त्यांनी अराह रिंगरोडला मंजुरी द्यायला सांगितले.

गडकरी यांनी सांगितले की बिहारमध्ये 30000 कोटी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे चालू आहेत. भूसंपादनाच्या  नुकसान भरपाईपोटी  4600 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.  पंतप्रधान पॅकेज अंतर्गत, ज्यात 1459 किलोमीटरच्या 24 प्रकल्पांचा समावेश आहे, हे काम 875 किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते बांधणीचे आहे. त्याअंतर्गत 125 कि.मी. साठी निविदा जारी करण्यात आली असून पुढील मार्चपर्यंत आणखी 459 कि.मी. साठी निविदा काढल्या जातील. ते म्हणाले, सीआरएफ अंतर्गत  बिहारमध्ये गेल्या सहा वर्षात  2097 कोटी रुपये मंजूर झाले असून आतापर्यंत  1281 कोटी रुपये देण्यात आले आहेत

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री  तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी, केंद्रीय मंत्री  आर के सिंह आणि जनरल (डॉ) व्ही के सिंह, राज्याचे अनेक मंत्री, केंद्र व राज्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1679712) Visitor Counter : 288