आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या चाचण्यांमध्ये वेगवान वाढ; एकूण चाचण्यांची संख्या 15 कोटीच्या पुढे गेली


गेल्या 10 दिवसात 1 कोटी चाचण्या घेण्यात आल्या

गेल्या सलग 11 दिवसांपासून नवीन रुग्णांची दैनंदिन संख्या 40,000 पेक्षा कमी

गेल्या पाच दिवसांपासून दररोज 500 पेक्षा कमी मृत्यूची नोंद

Posted On: 10 DEC 2020 12:28AM by PIB Mumbai


 

जागतिक महामारीच्या विरूद्ध लढ्यात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.  चाचण्यांची एकूण संख्या 15 कोटीच्या पुढे गेली आहे.

गेल्या 24  तासांत,9,22,959 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, त्यामुळे  भारताची चाचण्यांची एकूण संख्या  वाढून 15,07,59,726  झाली आहे.

शेवटच्या एक कोटी चाचण्या केवळ 10 दिवसात करण्यात आल्या. सातत्याने सर्वसमावेशक आणि व्यापक चाचण्या केल्यामुळे सकारात्मकता दर खाली आला आहे.

WhatsApp Image 2020-12-10 at 10.10.34 AM.jpeg

अन्य एका महत्त्वपूर्ण कामगिरीमध्ये, सलग अकरा दिवस भारतामध्ये दररोज 40,000 पेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात देशात केवळ 31,521 व्यक्ती कोविड बाधित असल्याचे आढळले.

WhatsApp Image 2020-12-10 at 10.10.50 AM.jpeg

तसेच याच काळात  37,725 रुग्ण बरे झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत आणखी घट झाली आहे. सध्या  भारतात 3,72,293 रुग्णांवर उपचार सुरु असून हे प्रमाण एकूण बाधित संख्येच्या केवळ 3.81% आहे.

WhatsApp Image 2020-12-10 at 10.04.07 AM.jpeg

आज बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  92.5 लाख (92,53,306) च्या पुढे गेली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सुधारून 94.74% पर्यंत गेला आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यांच्यातील तफावत निरंतर वाढत आहे आणि सध्या ती 8,881,013 आहे.

बरे झालेल्या रुग्णांपैकी 77.30 % रुग्ण हे 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील आहेत

महाराष्ट्रात काल 5,051 रुग्ण बरे झाले तर केरळमध्ये 4,647 आणि  दिल्लीत 4,177 रुग्ण बरे झाले आहेत.

WhatsApp Image 2020-12-10 at 9.58.28 AM.jpeg

नव्याने आढळून आलेले 74.65% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 4,981.  नवे रुग्ण आढळून आले केरळमध्ये 4,875 तर पश्चिम बंगालमध्ये  2,956 नवे रुग्ण आढळून आले.

WhatsApp Image 2020-12-10 at 9.58.25 AM.jpeg

गेल्या 24  तासांत 412 रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी 77.67% मृत्यू 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

नवीन मृत्यूपैकी 18.20% मृत्यू  महाराष्ट्रात झाले असून तिथे 75 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिल्लीतही 50 मृत्यू झाले असून हे प्रमाण  12.13 टक्के आहे.

WhatsApp Image 2020-12-10 at 9.58.26 AM.jpeg

गेल्या पाच दिवसांत दररोज होणाऱ्या  मृत्यूची संख्या  500 पेक्षा कमी आहे.

WhatsApp Image 2020-12-10 at 10.13.53 AM.jpeg

U.Ujgare/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1679623) Visitor Counter : 275