आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. हर्ष वर्धन यांनी 6 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 चा भाग म्हणून आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन ट्रायबल हेल्थ, जबलपूर द्वारा आयोजित व्हर्चुअल कर्टन रेझर सोहळ्याला डिजिटली संबोधित केले.
“भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हे कल्पनांचे आदानप्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देते ज्यामुळे आपल्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी उत्तम धोरण आखण्यास मदत होईल.”
आदिवासी लोकांचे आरोग्य आणि कल्याण हे सरकारसाठी अत्यंत महत्वाचे आहे - डॉ वर्धन
Posted On:
10 DEC 2020 3:45PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भू विज्ञान मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी जबलपूर येथे 6 व्या आंतरराष्ट्रीय महोत्सव 2020 चा भाग म्हणून आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन ट्रायबल हेल्थ द्वारा आयोजित व्हर्च्युअल कर्टन रेझर सोहळ्याला डिजिटली संबोधित केले.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), भू विज्ञान मंत्रालय (एमओईएस), जैव तंत्रज्ञान विभाग डीबीटी) आणि विज्ञान भारती (VIBHA). यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या आयआयएसएफ -2020 चे आयोजन वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) करीत आहे.
यावेळी डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “2015 मध्ये सुरू करण्यात आलेला आयआयएसएफ नेहमीच विज्ञानाची प्रगती आणि आपल्या लोकांच्या जीवनासाठी त्याचा वापर दर्शवणारा आहे. जबलपूर येथील आयसीएमआर-एनआयआरटीआयच्या वतीने आयोजित या कर्टन रेझर सोहळ्याचे अध्यक्षपद भूषवणे हा खरोखरच बहुमान आहे.”
आयसीएमआर - एनआयआरटीएच, जबलपूर ही आदिवासी लोकसंख्येशी संबंधित आरोग्य आणि सामाजिक प्रश्नांवर जैव-वैद्यकीय संशोधनाला समर्पित एकमेव संस्था आहे याबाबत आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, “आदिवासी भारतीय संस्कृतीतील एक अद्वितीय आणि रंगीबेरंगी घटक आहेत. आपले आदिवासी निसर्गाशी सुसंगत विश्वास, चालीरिती, मूल्ये आणि परंपरेसह जीवनशैली जगतात. निसर्गाचा प्रतिकार न करणारी ही जीवनशैली त्यांना विविध आजारांविरूद्ध अतिरिक्त प्रतिकारशक्ती प्रदान करते. मात्र ही चिंताजनक बाब आहे की आज आपली आदिवासी लोकसंख्या कुपोषण, अनुवांशिक विकार आणि संसर्गजन्य रोगांमुळे त्रस्त आहे."
ते पुढे म्हणाले, "अनेकदा कठीण भूभाग असलेल्या भागात कठीण परिस्थितीत राहिल्यामुळे आपल्या आदिवासींना विज्ञान, तंत्रज्ञान तसेच सार्वजनिक आरोग्य सेवा या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रगतीचे लाभ पोहचले नाहीत. ."
आदिवासी लोकांचे आरोग्य आणि कल्याण हे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, यावर डॉ वर्धन यांनी भर दिला. “आम्ही या संदर्भात अनेक उपाययोजना करत आहोत. 2018 मध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आदिवासी कल्याण मंत्रालयद्वारा संयुक्तपणे स्थापन तज्ज्ञ समितीने दहा प्रमुख बाबीं नमूद केल्या आहेत ज्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे आणि त्या दिशेने काम करण्यास सुरवात केली आहे, ”असे त्यांनी सांगितले.
जैव वैद्यकीय संशोधनात उल्लेखनीय योगदानाबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी आयसीएमआरचे अभिनंदन केले. आयसीएमआर-एनआयआरटीएच , जबलपूरने या जिल्ह्यात न पोहोचलेल्या भागात आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी स्वदेशी रणनीती विकसित केल्याबद्दल त्यांचे कौतुक करताना ते म्हणाले, “मध्य प्रदेशातील मंडला येथील सहारिया आदिवासींमध्ये क्षयरोग कमी करण्यासाठी आणि आदिवासी जिल्ह्यातील मलेरियाचे रुग्ण कमी करण्यासाठी आयसीएमआर-एनआयआरटीएचने पीपीपी मॉडेल यशस्वीरित्या राबवून दाखवले. या प्रतिष्ठित संस्थेने फ्लोराईड, पंडुरोग आणि सिकल-सेल सारख्या वारसाने मिळालेल्या हिमोग्लोबिनोपाथीजसारख्या रोगाचा आदिवासी लोकांमध्ये प्रादुर्भाव रोखण्यासाठी धोरणे विकसित केली आहेत. ” या सर्व प्रयत्नांमधून मिळालेला अनुभव केवळ संशोधक आणि शैक्षणिक तज्ज्ञांनाच नाही तर आपल्या समाजातील वंचित घटकांचे आरोग्य सुधारण्यासाठी धोरणकर्त्यानाही मदत करेल, असेही ते म्हणाले.
डॉ. वर्धन यांनी 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2020 या कालावधीत व्हर्चुअल स्वरूपात होणाऱ्या आयआयएसएफ -2020.मध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांना आमंत्रित केले. “भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात विचारांच्या आदानप्रदानासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले गेले आहे जेणेकरून आपल्या लोकांच्या राहणीमान सुधारण्यास मदत करण्यासाठी अधिक चांगले धोरण आखता येईल. मी नवोदित संशोधक आणि वैज्ञानिकांना या अनोख्या व्यासपीठावर सहभागी होण्यासाठी आणि विज्ञान आणि समाजातील दरी मिटवण्यास मदत करण्यासाठी आमंत्रित करतो, "असे ते म्हणाले.
संचालक व वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा, जयंत सहस्रबुद्धे राष्ट्रीय संघटन सचिव, विज्ञान भारती (VIBHA), डॉ. अपरूप दास, संचालक, आयसीएमआर-एनआयआरटीएच, जबलपूर, आणि इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि त्यांचे सहाय्यक यावेळी उपस्थित होते.
U.Ujgare/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679671)
Visitor Counter : 282