दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय टपाल विभागाने मानवी हक्क दिनानिमित्त विशेष लिफाफा प्रकाशित केला
Posted On:
10 DEC 2020 6:32PM by PIB Mumbai
भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळाने आज 10 डिसेंबर 2020 रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त 'मानवाधिकार' वर विशेष लिफाफा मुंबईत प्रकाशित केला,. महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरीशचंद्र अग्रवाल आणि , मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांच्या उपस्थितीत हा विशेष लिफाफा प्रकाशित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश जनजागृती करणे आणि समानता, सहकार्य, शांतता आणि लोकांमध्ये वैश्विक आदर सुनिश्चित करणे हा आहे.
मानवाधिकार दिन दर वर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी 1948 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने मानवाधिकारांचे सार्वत्रिक घोषणापत्र (यूडीएचआर) स्वीकारले. मानवाधिकारांचे सार्वत्रिक घोषणापत्र हा एक दस्तावेज आहे जो वंश, रंग, धर्म, लिंग, भाषा, राजकीय किंवा अन्य मत, राष्ट्रीय किंवा सामाजिक मूळ, मालमत्ता, जन्म किंवा इतर स्थिती याची पर्वा न करता प्रत्येकाला मानव म्हणून जे अधिकार आहेत ते अधिकृतपणे जाहीर करते. हा दस्तावेज 500 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध असून हा जगातील सार्वधिक अनुवादित दस्तावेज आहे.
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679728)
Visitor Counter : 276