PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 01 DEC 2020 9:43PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 1 डिसेंबर 2020

 

Coat of arms of India PNG images free download  

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

Image

 

वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवदीपावली महोत्सवात भाग घेतला. "हा काशीसाठी आणखी एक महत्त्वाचा क्षण आहे, कारण शंभराहून अधिक वर्षांपूर्वी चोरीला गेलेली माता अन्नपूर्णेची मूर्ती आता आपल्याकडे परत येत आहे. ही काशीसाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे." असे या सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले.

जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध कंपन्या लस विकसनात गुंतल्या असून, ऑक्सफर्ड ॲस्ट्रा झेनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने कोविड -19 लस उत्पादन आणि वितरण यंत्रणा सुरू केली आहे.

भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू आणि शांघाय सहकार्य संघटनेमधील सरकार प्रमुखांच्या परिषदेचे 2020 चे अध्यक्ष यांनी शांघाय सहकार्य संघटनेतल्या सामायिक बौद्ध वारसाविषयक पहिल्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. शांघाय सहकार्य संघटनेमधील सरकार प्रमुखांच्या परिषदेची आज 19 वी बैठक नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत प्रस्तुत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

भारतात आता सक्रीय कोविड रुग्णांची संख्या 5 लाखांपेक्षा कमी झाली असून आजची सक्रीय कोविड रुग्ण संख्या 4,35,603 इतकी आहे. सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णांच्या 4.60 % इतकी कमी झाली आहे.

प्रतिदिन रोगमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण सतत वाढत असल्यामुळे एकूण सक्रीय कोविड रुग्णसंख्येत खात्रीशीर आणि लक्षणीय घट दिसून येत आहे.

गेल्या चोवीस तासांच्या कालावधीत देशभरात नव्याने 31,118 व्यक्ती कोविड बाधित झाल्याची नोंद झाली.

केरळ, दिल्ली, कर्नाटक तसेच छत्तिसगढ यासारख्या काही राज्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत सक्रीय रुग्णसंख्येत घट झाली असली तरी उत्तराखंड,गुजरात,आसाम आणि गोवा यासह इतर काही राज्यांमध्ये या कालावधीत नोंदल्या गेलेल्या सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली.

गेल्या चोवीस तासांत 31,118 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली असली तरी कोविड मधून बरे झालेल्यांची संख्या त्यापेक्षा जास्त म्हणजे 41,985 इतकी आहे.

सद्यस्थितीला, कोविड संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 88,89,585 इतकी असून रोगमुक्तीचा दर 93.94% झाला आहे. उपचारानंतर बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्या संख्येतील तफावत सतत वाढत असून सध्या ही तफावत 84,53,982 इतकी आहे.

नव्याने रोगमुक्त झालेल्या कोविड बाधितांपैकी 76.82% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.

केरळमध्ये एका दिवसांत रोगमुक्त झालेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 6,055 इतकी असून त्याखालोखाल दिल्लीत 5,824 नव्या रोगमुक्तांची नोंद झाली आहे.

नोंद झालेल्या नव्या कोविड बाधितांपैकी 77.79% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत सर्वात जास्त म्हणजे 3,837 व्यक्ती नव्याने कोविड बाधित झाल्याची नोंद झाली, दिल्लीमध्ये काल दिवसभरात 3,726 तर त्याखालोखाल केरळमध्ये 3,382 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशभरात गेल्या 24 तासांत कोविडमुळे 482 रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी 81.12% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील होते. या काळात, एकूण मृत्यू पावलेल्यांपैकी 22.4% म्हणजे 108 रुग्ण दिल्लीमधील होते तर महाराष्ट्रात 80 आणि पश्चिम बंगालमध्ये 48 जण मृत्युमुखी पडले.

 

इतर अपडेट्स:

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी 2 डिसेंबर 2020 रोजी व्यापार मंडळाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होणार आहे. या बैठकीत नवे परकीय व्यापार धोरण(एफटीपी) (2021-26) आणि स्थानिक उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये 1,04,963 कोटी रुपयांचा एकूण जीएसटी महसूल जमा झाला आहे. त्यामध्ये 19,189 कोटी रुपये सीजीएसटी, 25,540 कोटी रुपये एसजीएसटी, 51,992 कोटी आयजीएसटी( आयात मालावरील संकलित 22,078 कोटी रुपयांसह) आणि 8242 कोटी रुपये अधिभाराचा समावेश आहे. 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत जीएसटीआर- 3बी विवरणपत्रांची एकूण संख्या 82 लाख झाली आहे.

केव्हीआयसी अर्थात खादी ग्रामोद्योग आयोगाने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सुरु केलेल्या स्वयं-रोजगारविषयक उपायांची चांगली फळं मिळू लागली आहेत. ज्या पीडित स्थलांतरित कामगारांना उत्तरप्रदेशात ऑगस्टमध्ये केव्हीआयसीच्या मध मोहिमेत सामावून घेतले गेले होते, त्यांनी मधाचे पहिले उत्पादन घेतले आहे. आता डिसेंबर ते मार्चच्या काळात ते मोठ्या उत्पादनाच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्र अपडेट्स :

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना 200 रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळीनंतर, नागरी संस्थेने शहरातील सर्वत्र तपासणीचे अभियान वाढविले आहे. बीएमसीने म्हटले आहे की, एप्रिलपासून 28 नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल 4.85 लाख नागरिकांवर कारवाई केली गेली आणि त्यांच्याकडून 10.7 कोटी रूपये दंड वसूल केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोल्ड स्टोरेज सुविधांसाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कांजूरमार्ग येथील इमारतीत 5 हजार चौरस फूटचे कोल्ड स्टोरेज सुविधेमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. 15 डिसेंबरपर्यंत हे तयार होईल. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी माहिती दिली की कोल्ड स्टोअर हाऊससाठी नेमक्या जागांचा शोध सुरू आहे, तर कांजूरमार्ग येथील एका जागेला अंतिम रूप देण्यात आले आहे.

 

FACT CHECK

 

 

 

 

 

 

Image

 

 

Image

****

***

M.Chopade/S.Tupe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1677539) Visitor Counter : 141