अर्थ मंत्रालय

नोव्हेंबर 2020 मध्ये 1,04,963 कोटी रुपयांचा एकूण जीएसटी महसूल जमा

Posted On: 01 DEC 2020 1:45PM by PIB Mumbai

 

नोव्हेंबर 2020 मध्ये 1,04,963 कोटी रुपयांचा एकूण जीएसटी महसूल जमा झाला असून त्यामध्ये 19,189 कोटी रुपये सीजीएसटी, 25,540 कोटी रुपये एसजीएसटी, 51,992 कोटी आयजीएसटी( आयात मालावरील संकलित 22,078 कोटी रुपयांसह) आणि 8242 कोटी रुपये अधिभाराचा समावेश आहे. 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत जीएसटीआर- 3बी विवरणपत्रांची एकूण संख्या 82 लाख झाली आहे.

सरकारने आयजीएसटीमधून नियमित तडजोड म्हणून 22,293 कोटी सीजीएसटी आणि 16,286 कोटी रुपये एसजीएसटी चा निपटारा केला आहे. नोव्हेंबर 2020मध्ये नियमित निपटाऱ्यानंतर केंद्र  आणि राज्य सरकारांनी मिळवलेला एकूण महसूल 41,482 कोटी रुपये सीजीएसटी तर 41,826 कोटी रुपये एसजीएसटी आहे.

सध्या वसूल केलेल्या जीएसटी महसुलाचा कल पाहाता, नोव्हेंबर 2020 मध्ये गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत 1.4 टक्के जास्त महसूल जमा झाला आहे. या महिन्यात आयात मालावरील महसूल गेल्या वर्षी याच काळातील महसुलाच्या  4.9 टक्के जास्त आहे आणि स्थानिक व्यवहारांमधून ( आयात सेवांसहित)  मिळालेला महसूल 0.5 टक्क्यांनी जास्त आहे.

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये चालू वर्षातील जीएसटी महसुलाचा कल दिसून येत आहे. नोव्हेंबर 2019 च्या तुलनेत नोव्हेंबर 2020 मध्ये प्रत्येक राज्यात जमा झालेल्या जीएसटीची आकडेवारी खालील तक्त्यात दिसत आहे.

State-wise growth of GST Revenues during Nov 2020

 

State

Nov-19

Nov-20

Growth

Jammu and Kashmir

363

360

-1%

Himachal Pradesh

701

758

8%

Punjab

1,375

1,396

2%

Chandigarh

165

141

-14%

Uttarakhand

1,280

1,286

0%

Haryana

5,904

5,928

0%

Delhi

3,995

3,413

-15%

Rajasthan

3,071

3,130

2%

Uttar Pradesh

5,678

5,528

-3%

Bihar

1,107

970

-12%

Sikkim

157

223

42%

Arunachal Pradesh

36

60

68%

Nagaland

23

30

31%

Manipur

35

32

-9%

Mizoram

17

17

0%

Tripura

51

58

13%

Meghalaya

117

120

2%

Assam

958

946

-1%

West Bengal

3,460

3,747

8%

Jharkhand

1,720

1,907

11%

Odisha

2,347

2,528

8%

Chhattisgarh

2,176

2,181

0%

Madhya Pradesh

2,453

2,493

2%

Gujarat

6,805

7,566

11%

Daman and Diu

101

2

-98%

Dadra and Nagar Haveli

145

296

105%

Maharashtra

15,968

15,001

-6%

Karnataka

6,972

6,915

-1%

Goa

342

300

-12%

Lakshadweep

2

0

-75%

Kerala

1,691

1,568

-7%

Tamil Nadu

6,449

7,084

10%

Puducherry

157

158

1%

Andaman and Nicobar Islands

25

23

-7%

Telangana

3,349

3,175

-5%

Andhra Pradesh

2,230

2,507

12%

Ladakh

-

9

 

Other Territory

153

79

-48%

Centre Jurisdiction

95

138

45%

Grand Total

81,674

82,075

0.5%

 

 

****

 

M.Chopade/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1677393) Visitor Counter : 271