वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

व्यापार मंडळाची 2 डिसेंबर 2020 रोजी बैठक होणार


नवे परकीय व्यापार धोरण आणि स्थानिक उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्याच्या उपाययोजनांवर बैठकीत भर दिला जाणार

Posted On: 01 DEC 2020 2:25PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी 2 डिसेंबर 2020 रोजी व्यापार मंडळाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होणार आहे.

या बैठकीत नवे परकीय व्यापार धोरण(एफटीपी) (2021-26) आणि स्थानिक उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील संबंधितांशी नियमित चर्चा आणि सल्लामसलत करण्याची आणि भारताच्या व्यापाराला चालना देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारला परकीय व्यापार धोरणाशी  संबंधित उपाययोजना सुचवण्यासाठी बीओटी हा मंच एक संधी उपलब्ध करून देत असतो. राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या व्यापार धोरणाशी संबंधित दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी आणि भारत सरकारला देखील भारताच्या व्यापाराच्या क्षमतेवर आणि संधींवर परिणाम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यासाठी एक व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध होते. या बैठकीत आयात/निर्यातीची कामगिरी, आत्मनिर्भर भारतासाठी( सार्वजनिक खरेदीसह- मेक इन इंडिया) गुंतवणूक प्रोत्साहन धोरण, व्यापारविषयक उपायोजना- अलीकडच्या उपाययोजना आणि उचललेली पावले, नवे लॉजिस्टिक्स धोरण, व्यापाराला चालना देण्यासाठी सीमाशुल्क विभागाने केलेल्या उपाययोजना, बीओटीच्या गेल्या बैठकीपासून केलेल्या सुधारणा आणि उपक्रम, जेम- व्याप्ती आणि विस्तार आणि परकीय व्यापार धोरणाशी संबंधित विविध प्रकारच्या सूचना यांचा विचार केला जाणार आहे.

 

U.Ujgare/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1677336) Visitor Counter : 113