PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 19 OCT 2020 7:12PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

दिल्ली-मुंबई, 19 ऑक्टोबर  2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी दीक्षांतसोहळा-2020 ला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले.

याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, म्हैसूर विद्यापीठ प्राचीन भारतातील महान शिक्षण केंद्र आणि भविष्यातील भारताच्या आकांक्षा आणि क्षमतांचे केंद्र आहे. विद्यापीठाने "राजर्षी" नलवडी कृष्णराज वाडियार आणि एम. विश्वेश्वरय्या जी यांचे स्वप्न साकार केले आहे.

त्यांनी या विद्यापीठात अध्यापन केलेल्या भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जी यांचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग वास्तविक जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावर करण्याचे आवाहन केले. त्यांनी वास्तविक जीवनाला एक महान विद्यापीठ म्हणून संबोधले जे ज्ञानाच्या वापरासाठीचे विविध मार्ग शिकवते.

 

पंतप्रधानांनी देशाची भौगोलिक व्याप्ती आणि विविधता लक्षात घेऊन कोरोनावरील लस उपलब्धता जलद गतीने सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. लस वाहतूक , वितरण आणि व्यवस्थापनातील प्रत्येक पाऊल कठोरपणे उचलण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यामध्ये शीतगृह साखळी, वितरण नेटवर्क, देखरेख यंत्रणा, आगाऊ मूल्यांकन आणि वेल्स, सिरिंज इ.आवश्यक उपकरणे तयार करणे यांचा समावेश असावा.

आपण निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुभवाचा देशात वापर करायला हवा असेही त्यांनी निर्देश दिले. पंतप्रधान म्हणाले की, त्याच पद्धतीने लस वितरण आणि प्रशासकीय यंत्रणाचे नियोजन केले जावे. यात राज्ये / केंद्रशासित प्रदेश / जिल्हा पातळीवरील अधिकारी, नागरी संस्था, स्वयंसेवक, नागरिक आणि सर्व आवश्यक क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग असावा.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

भारतामध्ये सक्रिय रूग्णसंख्येत सातत्याने घट होण्याचा कल कायम- कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने आणखी एक टप्पा ओलांडला आहे. राष्ट्रीय सक्रीय  रूग्णसंख्या दरामध्ये सातत्याने घट होत असून, हा दर 8 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. विशेष म्हणजे सलग चौथ्या दिवशी हा दर खाली आल्याची नोंद झाली आहे. राष्ट्रीय रुग्णसंख्या दर 7.94 टक्के नोंदला गेला असून तो सतत कमी होत आहे.

संपूर्ण देशभरामध्ये व्यापक स्तरावर चाचण्या केल्या जात असल्यामुळे रुग्णसंख्येमध्ये घट     येत असल्याचे दिसून येत आहे. चाचण्यांची संख्या आजवर 9.5 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

ऑक्टोबरच्या तिस-या आठवड्यात दैनिक सरासरी सक्रिय रुग्णदर 6.13 टक्के आहे. केंद्र सरकारने ‘टेस्ट- ट्रॅक- ट्रेस- ट्रिट अँड टेक्नॉलॉजी’ अशी रणनिती कोविड-19 च्या विरोधात आखली आहे. त्याचे अनुसरण सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केले जात आहे.

भारतामध्ये सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घट नोंदवली जाण्याचा कल कायम आहे. सलग तिस-या दिवशी सक्रिय रूग्णसंख्या 8 लाखांपेक्षा कमी नोंदली गेली आहे.

 

सणांच्या दिवसात उत्सवापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे डॉ हर्ष वर्धन- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्ष वर्धन यांनी संडे संवाद कार्यक्रमाच्या सहाव्या भागात समाजमाध्यम संवादकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांनी अनुसारकांना पंतप्रधानांच्या जनआंदोलन आवाहनाला प्रतिसाद देउन त्या आंदोलनाचे दूत होऊन कोविड रोखण्याच्या दृष्टीने योग्य वर्तणूक राखण्याची सूचना केली. सध्याच्या सण/उत्सवाच्या काळात सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे डॉ हर्ष वर्धन म्हणाले.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स :

सुमारे सात महिन्यानंतर मुंबई मेट्रो रेल्वे सेवा सुरु झाली. मोनोरेलही सुरु झाली. सामाजिक अंतराचे निकष पाळण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात मर्यादीत प्रवासी संख्येने या रेल्वे धावत आहेत. घाटकोपर-वर्सोवा रेल्वेमार्गावर सकाळी 8.30 ते संध्याकाळी 8.30 या वेळेत मेट्रो रेल्वे धावत आहेत. पूर्वी 1,350  प्रवासी घेऊन जाणारी मेट्रो सध्या 360 प्रवाशांसह धावत आहे, तसेच रेल्वेफेऱ्यांची संख्या 400 वरुन 200 केली आहे. प्रत्येक प्रवेशद्वाराला आरोग्य तपासणी किऑस्कस उभारले आहेत. प्रवासादरम्यान मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.

FACT CHECK

 

* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1665881) Visitor Counter : 210