आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ हर्ष वर्धन यांनी संडे संवाद कार्यक्रमाच्या सहाव्या भागात दिल्या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


“ सणांच्या दिवसात उत्सवापेक्षा काळजीला प्राधान्य द्यावे”

आरोग्यमंत्रालयाकडून 33 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना 1352 कोटी रुपये जारी

Posted On: 18 OCT 2020 5:19PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2020

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्ष वर्धन यांनी संडे संवाद कार्यक्रमाच्या सहाव्या भागात समाजमाध्यम संवादकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांनी अनुसारकांना पंतप्रधानांच्या जनआंदोलन आवाहनाला प्रतिसाद देउन त्या आंदोलनाचे दूत होऊन कोविड रोखण्याच्या दृष्टीने योग्य वर्तणूक राखण्याची सूचना केली. सध्याच्या सण/उत्सवाच्या काळात सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे डॉ हर्ष वर्धन म्हणाले.

केरळमध्ये सध्या कोविड-19 रुग्णांमध्ये वाढ होत असल्याबाबत हर्ष वर्धन यांनी विचार मांडले. 30 जानेवारी ते 3 मे पर्यंत केरळमध्ये फक्त 499 रुग्णसंख्या आणि 2 मृत्यू नोंदले गेले होते. सामुदायिक निष्काळजीपणाचा केरळला फटका बसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.  नुकत्याच झालेल्या ओणम सणादरम्यान राज्यस्तरीय सेवा अनलॉक केल्यामुळे तसेच व्यापार आणि पर्यटनासाठी राज्यांतर्गत आणि आंतरराज्य प्रवास या बाबी विविध जिल्ह्यांमध्ये कोविड-19 चा संसर्ग पसरण्यास कारणीभूत झाल्या. केरळ राज्यात ओणम सणाचे निमित्त होऊन कोविड रुग्णसंख्येचा आलेख पुर्णपणे बदलला, दैनंदिन रुग्णसंख्या आदल्या दिवशीच्या दुप्पट होऊ लागली. सणांच्या दिवसांमधील नियोजनात हलगर्जीपणा होऊ नये यासाठी सर्वच राज्य सरकारांनी केरळचे हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे, असे ते म्हणाले. 

गेल्या वर्षी अनेक देशात एकाच वेळी कोविडचा उद्भव दिसून आला या चीनच्या दाव्यावर बोलताना हर्षवर्धन म्हणाले, जगात एकाच वेळी नोवेल कोरोना विषाणू उद्भवाच्या दाव्यासंदर्भात कोणताही पुरावा नाही. चीनमधील वुहान हेच जागतिक  पातळीवर पहिला रुग्ण आढळासाठी ओळखले जाणार.

चीनमध्ये तयार झालेल्या ऑक्सिमीटरनी बाजारपेठा ओसंडून वाहत आहेत यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन यांनी बाजारातून वा ऑनलाईन माध्यमातून पल्स ऑक्सिमीटर खरेदी करताना ग्राहकांनी FDA/CE मंजूरीप्राप्त आणि ISO/ IEC तपशील असलेली उत्पादने शोधायला हवीत. यासोबतच प्राणवायूची लक्षणीय कमतरता हे फक्त कोविड-19 चे लक्षण नाही तर अनेक दुर्लक्षात वैद्यकीय परिस्थितीतही ते होऊ शकते असे त्यांनी स्पष्ट केले,

संसर्गप्रधान आणि रोगजनक असलेल्या कोरोना विषाणूत कोणतेही परिवर्तन (म्युटेशन) भारतात आढळून आले नाही असे हर्ष वर्धन यांनी नमूद केले. कोरोनाविरोधातील लढ्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत 1352 कोटी रुपये दुसऱ्य टप्प्यात दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

देशातील कोविड मृत्यूसंख्येसंबधातील त्रुटींवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले की, देशभरात कोविड-19 ने झालेल्या मृत्यू नोंदीत एकसंधता रहावी म्हणून राज्यांनी दिलेल्या कोविड संबधीची आकडेवारीची आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने वेळोवेळी खात्री करून घेतली आहे. तसेच मृत्यूच्या नोंदणीसंदर्भातील मानक प्रक्रिया त्यांना दिली आहे.

देशात वैद्यकीय प्राणवायूची कमतरता नाही, अशी खात्री देऊन त्यांनी भारताची सध्याची प्राणवायू निर्मिती क्षमता प्रतिदिन 6400 MT असल्याचे सांगितले. महामारी कालखंडात प्राणवायूची वाढीव गरज भासली तर अधिक उत्पादन करण्यास केंद्रसरकार तयार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजूर केलेला गट प्राणवायूच्या गरजेवर लक्ष ठेवून आहे असेही त्यांनी सांगितले. प्राणवायू उपलब्धता आणि पुरवठा यासाठी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय हे राज्य नोडल अधिकारी आणि मुख्य सचिव वा मिशन संचालक यांच्याशी संपर्कात असते, असे त्यांनी स्पष्ट केले. 1,02,400 प्राणवायू सिलेंडर विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आले. नॅशनल फार्मास्युटीकल प्राइसिंग अॅथॉरिटीने द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचे दर निश्चित केले आहेत. प्राणवायूचा गरजेनुसार आणि योग्य पद्धतीने वापर यासंबधातील नियमावलीही देण्यात आली आहे.

ही खास मोहीम आताच्या औषधोपचारांबद्दल चुकीच्या प्रतिक्रिया आल्यामुळे नाही तर ती कोविड-19 प्रतिबंध कार्यक्रमाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

CSIR-IIP आणि GAIL ने डेहराडून येथे आपण 2019 मध्ये उद्‌घाटन केलेल्या प्रात्यक्षिक प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती त्यांनी दिली. यामध्ये 1000 किलो टाकावू प्लॅस्टीकपासून 800 ली BS-VI दर्ज्याचे डिझेल प्रतिदिन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

संडे संवादचे भाग पाहण्यासाठी कृपया पुढील लिंक्सवर क्लिक करा.

Twitter: https://twitter.com/drharshvardhan/status/1317730112872226817?s=20

Facebook: https://www.facebook.com/watch/?v=1114364852316144

Youtube: https://www.youtube.com/watch?v=OYQw5Q8ISPk

DHV App: http://app.drharshvardhan.com/download

 

S.Thakur/ V.Sahajrao/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665669) Visitor Counter : 182