आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतामध्ये सक्रिय रूग्णसंख्येत सातत्याने घट होण्याचा कल कायम
तिस-या दिवशी सक्रिय रूग्णसंख्या 8 लाखांपेक्षा कमी
राष्ट्रीय रूग्णसंख्या दर सलग चौथ्या दिवशी 8 टक्क्यांपेक्षाही कमी
Posted On:
19 OCT 2020 2:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2020
कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने आणखी एक टप्पा ओलांडला आहे. राष्ट्रीय रूग्णसंख्या दरामध्ये सातत्याने घट होत असून, हा दर 8 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. विशेष म्हणजे सलग चौथ्या दिवशी हा दर खाली आल्याची नोंद झाली आहे. राष्ट्रीय रुग्णसंख्या दर 7.94 टक्के नोंदला गेला असून तो सतत कमी होत आहे.
संपूर्ण देशभरामध्ये व्यापक स्तरावर चाचण्या केल्या जात असल्यामुळे रुग्णसंख्येमध्ये घट येत असल्याचे दिसून येत आहे. चाचण्यांची संख्या आज 9.5 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

चाचण्या करण्याचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या दर कमी होण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच कोरोनाच्या संक्रमणाचा प्रसार होण्याचे, प्रमाणही कमी होत असल्याचे एकूण राष्ट्रीय रुग्णदर घटलेला पाहता, लक्षात येत आहे.
देशाच्या सर्व भागांमध्ये व्यापक चाचण्या करण्यात येत असल्यामुळे सक्रिय रूग्णांना लवकर चिन्हित केले जावू शकते. त्यामुळे त्यांच्यावर वेळेवर आणि प्रभावी औषधोपचार सुरू केले जात आहेत. ज्या लोकांना अगदी किरकोळ स्वरूपात कोरोनाची बाधा झाली असेल त्यांना घरामध्येच विलग ठेवून औषधोपचार केले जात आहेत तसेच सक्रिय रूग्ण गंभीर स्वरूपाचा असेल तर त्याला रूग्णालयात वेळेवर दाखल करून योग्य ते उपचार केले जात आहेत. या उपाय योजनांमुळे कोविड-19 रुग्णांचा मृत्यूदर कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ऑक्टोबरच्या तिस-या आठवड्यात दैनिक सरासरी सक्रिय रुग्णदर 6.13 टक्के आहे. केंद्र सरकारने ‘टेस्ट- ट्रॅक- ट्रेस- ट्रिट अँड टेक्नॉलॉजी’ अशी रणनिती कोविड-19 च्या विरोधात आखली आहे. त्याचे अनुसरण सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केले जात आहे.

भारतामध्ये सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घट नोंदवली जाण्याचा कल कायम आहे. सलग तिस-या दिवशी सक्रिय रूग्णसंख्या 8 लाखांपेक्षा कमी नोंदली गेली आहे.
भारतामध्ये आज 7,72,055 सक्रिय रुग्ण आहेत.
देशातल्या एकूण सक्रिय रूग्णांपैकी हे प्रमाण केवळ 10.23 टक्के आहे.
देशात 66 लाखांपेक्षा जास्त रूग्ण (66,63,608) कोरोना आजारमुक्त झाले आहेत. सक्रिय रूग्ण आणि बरे झालेले रूग्ण यांच्या संख्येत मोठा फरक दिसून येत आहे. रूग्णवाढीपेक्षा रूग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे.
गेल्या 24 तासांमध्ये 66,399 कोरोनाचे रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर नव्याने कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांची संख्या 55,722 नोंदवली गेली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर प्रगतीपथावर असून तो आता 88.26 टक्के आहे.
नव्याने कोरोना आजार बरा झालेल्या रूग्णांमध्ये 79 टक्के 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यातल्या रूग्णांचा समावेश आहे.
एकट्या महाराष्ट्रातून 11,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाल्याची नोंद एका दिवसात झाली आहे. त्याखालोखाल केरळ आणि कर्नाटकमधून 8,000 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये 55,722 जणांना कोविड झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
नव्याने कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये 81 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. यामध्येही महाराष्ट्र आघाडीवर असून गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातल्या 9000 पेक्षा जास्त जणांना कोरोना झाल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ केरळ आणि कर्नाटक राज्यात प्रत्येकी 7000 पेक्षा जास्त जणांना कोरोना झाला.

गेल्या 24 तासांत 579 जणांना कोरोना आजारामुळे प्राण गमवावे लागले. या आजारामुळे होणा-या मृत्यूंचा आकडा 90 दिवसांनंतर 600 च्या खाली नोंदवला गेला आहे.
यापैकी 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले जवळपास 83 टक्के रूग्ण आहेत.
कोरोना आजारामुळे मरण पावलेल्या रूग्णांपैकी 25 टक्क्यांपेक्षा जास्त रूग्ण महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 150 जणांचे निधन या आजारामुळे झाले.

* * *
U.Ujgare/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665785)
Visitor Counter : 226
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam