अर्थ मंत्रालय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सीपीएसईच्या भांडवली खर्चासंदर्भातील चौथी आढावा बैठक घेतली
Posted On:
19 OCT 2020 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2020
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि कोळसा मंत्रालयाच्या सचिव तसेच या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या 14 सार्वजनिक उद्यमांच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत चालू आर्थिक वर्षातील भांडवली खर्चाबाबत बैठक घेतली. कोविड-19 संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासंदर्भातील विविध भागधारकांशी बैठकांचे सत्र सुरु आहे, त्यातील ही चौथी बैठक होती.
2019-2020 या आर्थिक वर्षात या 14 सीपीएसईच्या भांडवली खर्चाच्या 1,11,672 कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 1,16,323 कोटी रुपये प्राप्त झाले जे 104 टक्के आहे. 2019-2020 या आर्थिक वर्षात एच - 1 ची उपलब्धी, 43,097 कोटी (39 टक्के) आणि 2020-21 मध्ये एच -1 ची उपलब्धी, 37,423 कोटी ( 32टक्के) होती. 2020-21 मधील भांडवली खर्च (कॅपेक्स) लक्ष्य 1,15,934 कोटी रुपये होते.
या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या कामगिरीचा आढावा घेताना सितारामन म्हणाल्या की सीपीएसईचा कॅपेक्स आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांमध्ये त्याचा दर्जा आणखी वाढवणे आवश्यक आहे. अर्थमंत्र्यांनी संबंधित सचिवांना सीपीएसईंच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी सांगितले जेणेकरून वित्तीय वर्ष 2020-21 च्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरपर्यंत भांडवली खर्चाच्या 75% भांडवली खर्च निश्चित व्हावा आणि त्यासाठी योग्य ती योजना तयार करावी. भांडवली खर्चाचे लक्ष्य गाठण्यासाठी सर्व संबंधित मंत्रालयांचे सचिव आणि सीपीएसईच्या सीएमडी स्तरावर अधिक समन्वित प्रयत्न करण्याची गरज आहे असेही सीतारामन यावेळी म्हणाल्या.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये सीपीएसईची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन अर्थमंत्र्यांनी सीपीएसईंना त्यांची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भांडवली खर्चाच्या नियोजनासाठी योग्य व वेळेवर खर्च निश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.
सीपीएसईच्या भांडवली खर्चाचा (सीएपीईएक्स) आढावा आर्थिक व्यवहार विभाग आणि सार्वजनिक उपक्रम विभागाने संयुक्तपणे घेतला.
* * *
U.Ujgare/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665811)
Visitor Counter : 248
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam