PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 10 SEP 2020 8:06PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

दिल्ली-मुंबई, 10 सप्टेंबर 2020

 

 

या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आज सुरू करण्यात आलेल्या या सर्व योजनामागील हेतू आपल्या गावांना सक्षम बनवणे आणि 21 व्या शतकात भारताला स्वयंपूर्ण  (आत्मनिर्भर भारत) बनवणे हा आहे.

 

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

देशभरात गेल्या 24 तासांत एकूणात 95,735 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

एकूण रुग्णांच्या 60 % रुग्ण हे केवळ पाच राज्यांमधील आहेत. एकट्या महाराष्ट्रातील 23,000 पेक्षा अधिक आणि आंध्र प्रदेशमधील 10,000 रुग्णांचा त्यात समावेश आहे.

आजच्या दिवसाला देशभरात एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 9,19,018 इतकी आहे.

एकूण सक्रीय रुग्णांपैकी 74 % रुग्णसंख्या ही सर्वाधिक बाधित 9 राज्यांमधून आहे. एकूण सक्रीय रुग्ण संख्येपैकी 49 % रुग्णसंख्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील आहे. सरासरी पाहता महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 2,50,000 पेक्षा अधिक तर कर्नाटक आणि आंध प्रदेश येथे प्रत्येकी 97,000 पेक्षा अधिक रुग्णसंख्या आहे.

गेल्या 24 तासात एकूण 1,172 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी काल 32 % म्हणजे 380 मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली तर कर्नाटकमध्ये 128 आणि तामिळनाडूमध्ये 78 मृत्यूंची नोंद झाली.

एकूण मृत्यूंपैकी, 69 % रुग्णांचे मृत्यू हे महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि आंध्रप्रदेश या पाच राज्य / केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाले आहेत.  

 

इतर अपडेट्स:

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांबरोबरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे स्पष्टपणे सांगितले आहे कि खालील दोन विशिष्ट श्रेणीतील व्यक्तींची आरटी-पीसीआर चाचणीद्वारे पुन्हा तपासणी करणे अनिवार्य आहे:

1. रपिड अँटीजेन टेस्ट (आरएटी) ची सर्व लक्षणात्मक (ताप किंवा खोकला किंवा श्वासोच्छवासाला त्रास) निगेटिव्ह प्रकरणे

2. निगेटिव्ह चाचणी झाल्यापासून 2 ते 3 दिवसांच्या आत लक्षणे विकसित होणा-या लक्षणहीन निगेटिव्ह प्रकरणांची  रॅपिड अँटीजेन टेस्ट (आरएटी)

 

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात बुधवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक 23,816 कोविड रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 9,67,349 इतकी झाली आहे. तसेच कोविडमुळे 325 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 27,732 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2,52,734 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोविडचे 2,227 नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 1,60,744 इतकी झाली आहे. शहरात  43 रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला असून एकूण मृत्यू संख्या 7,982 इतकी झाली आहे. 1,26,745 इतके रुग्ण बरे झाले असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 25,659 इतकी आहे.

 

FACTCHECK

 

* * *

M.Chopade/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1653136) Visitor Counter : 193