आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आरटी-पीसीआरद्वारे रॅपिड अँटीजेन टेस्टच्या सर्व लक्षणात्मक निगेटिव्ह प्रकरणांची अनिवार्यपणे तपासणी करण्याचे आरोग्य मंत्रालयाचे राज्य / केंद्रशासित प्रदेशांना आवाहन


संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कोणतीही सक्रिय व्यक्ती चाचणीपासून वंचित न ठेवण्याचे राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी सुनिश्चित करावे

Posted On: 10 SEP 2020 3:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 सप्‍टेंबर 2020


काही मोठ्या राज्यांत, रॅपिड अँटीजेन टेस्ट (आरएटी) द्वारे चाचणी केलेल्या लक्षणात्मक निगेटिव्ह प्रकरणांचा पाठपुरावा आरटी-पीसीटी चाचणीद्वारे केला जात नसल्याची बाब केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निदर्शनास आली आहे.

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांबरोबरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे स्पष्टपणे सांगितले आहे कि खालील दोन विशिष्ट श्रेणीतील व्यक्तींची आरटी-पीसीआर चाचणीद्वारे पुन्हा तपासणी करणे अनिवार्य आहे:

  1. रॅपिड अँटीजेन टेस्ट (आरएटी) ची सर्व लक्षणात्मक (ताप किंवा खोकला किंवा श्वासोच्छवासाला त्रास) निगेटिव्ह प्रकरणे 
  2. निगेटिव्ह चाचणी झाल्यापासून 2 ते 3 दिवसांच्या आत लक्षणे विकसित होणा-या लक्षणहीन निगेटिव्ह प्रकरणांची  रॅपिड अँटीजेन टेस्ट (आरएटी)

या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर यांनी संयुक्तपणे सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून आरटी-पीसीआर चाचणीचा वापर करून सर्व लक्षणात्मक निगेटिव्ह प्रकरणांची आरएटीद्वारे पुन्हा अनिवार्यपणे नोंद करणे सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. अशा लक्षणात्मक निगेटिव्ह व्यक्ती पुन्हा तपासणीपासून सुटू नयेत आणि ते त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रसार करणार नाहीत हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. याद्वारे खोट्या निगेटिव्ह व्यक्तींचा लवकर तपास करून त्यांना विलगीकरणात/ रुग्णालयात ठेवणे सुद्धा सुनिश्चित करता येईल. एखाद्या क्षेत्रातील तपासणीचा आवाका आणि उपलब्धता यात वाढ होण्यासाठी आरएटी चा उपयोग केला जात आहे तर आरटी-पीसीआर हे कोविड चाचण्यांचे सुवर्ण मानक बनले आहे असे संयुक्त पत्रात म्हटले आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही राज्य / केंद्रशासित प्रदेशांना तातडीने प्रत्येक जिल्ह्यात (नियुक्त अधिकारी किंवा पथक) आणि राज्य पातळीवर अशा प्रकारच्या घटनांचा पाठपुरावा करण्यासाठी एक देखरेख यंत्रणा स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. हे कार्यसंघ आणि राज्यांत दररोज घेण्यात आलेल्या आरएटीच्या तपशीलांचे विश्लेषण करतील आणि सर्व लक्षणात्मक निगेटिव्ह व्यक्तींची पुन्हा तपासणी करण्यात विलंब होणार नाही याची खात्री करुन घेतील. राज्य / केंद्र शासित प्रदेशांचे उद्दीष्ट हे असावे की संभाव्य सक्रिय व्यक्ती तपासणीतून निसटू नये. पाठपुरावा म्हणून घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचण्या दरम्यान सक्रिय व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी नियमितपणे विश्लेषण करण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे.

 

* * *

B.Gokhale/V.Joshi/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1653000) Visitor Counter : 228