अर्थ मंत्रालय

अर्थमंत्र्यांनी डोअरस्टेप बँकिंग सेवांचे अनावरण केले आणि EASE 2.0 निर्देशांक निकाल घोषित केले

Posted On: 09 SEP 2020 10:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून दिल्या जाणाऱ्या डोअरस्टेप बँकिंग सेवेचे उद्घाटन केले आणि ईएएसई बँकिंग सुधारणा निर्देशांकानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांचा सत्कार करण्यासाठी पुरस्कार समारंभात सहभागी झाल्या.

या व्हर्च्युअल कार्यक्रमाला वित्तीय सेवा विभाग सचिव,देबाशीष पांडा आणि आयबीएचे अध्यक्ष रजनीश कुमार हे देखील उपस्थित होते.

पीएसबीद्वारे डोअरस्टेप बँकिंग सेवा

ईएएसई सुधारणांचा एक भाग म्हणून, कॉल सेंटर, वेब पोर्टल किंवा मोबाइल ॲपच्या सार्वत्रिक टच पॉइंट्सद्वारे ग्राहकांना त्यांच्या दारात बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी डोअरस्टेप बँकिंग सेवेची कल्पना मांडण्यात आली. या सुविधांच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या सेवा विनंतीचा मागोवा घेता येईल.

या सेवा देशभरातील 100 केंद्रांवर निवडलेल्या सेवा पुरवठादारांद्वारे नियुक्त केलेल्या डोअरस्टेप बँकिंग एजंट्सद्वारे सादर केल्या जातील.

सध्या केवळ बिगर -आर्थिक सेवा उदा. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट घेणे (चेक / डिमांड ड्राफ्ट / पे ऑर्डर इ.), नवीन चेक बुक स्लिप घेणे , 15G / 15H फॉर्म घेणे , आयटी / जीएसटी चलान घेणे, स्थायी सूचनांसाठी विनंती, अकाउंट स्टेटमेंट विनंती , वैयक्तिकृत नसलेली चेक बुक वितरण, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, मुदत ठेव पावती देणे, पोचपावती इ. टीडीएस / फॉर्म 16 प्रमाणपत्र देणे, प्री-पेड इन्स्ट्रुमेंट / गिफ्ट कार्डची डिलिव्हरी ग्राहकांना उपलब्ध आहे. ऑक्टोबर 2020 पासून आर्थिक सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील.

या सेवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ग्राहकांना नाममात्र शुल्कात घेता येतील. या सेवेचा फायदा सर्व ग्राहकांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना होईल ज्यांना या सेवांचा लाभ घेणे सुलभ होईल.

ईएएसई 2.0 निर्देशांकात पीएसबीची कामगिरी

पीएसबी, ईएएसई साठी एक सामान्य सुधारणा कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश स्वच्छ आणि स्मार्ट बँकिंग संस्थात्मकीकरण करणे आहे. जानेवारी 2018 मध्ये याची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतरच्या कार्यक्रमाची आवृत्ती - EASE 2.0 ईएएसई 1.0 मध्ये केलेल्या पायाभरणीवर उभी राहिली. आणि सुधारणांवरील प्रगती पुढे नेली. EASE 2.0 मधील सुधारणा कृती मुद्दयांचा उद्देश सुधारणा प्रवास अपरिवर्तनीय बनवणे, प्रक्रिया आणि प्रणाली मजबूत करणे आणि याचे परिणाम दाखवणे हा आहे.

EASE 2.0 सुधारणा कार्यक्रम सुरू झाल्यापासून पीएसबींनी चार तिमाहींमध्ये कामगिरीत चढता आलेख दाखविला आहे. मार्च -2019 आणि मार्च - 2020 या कालावधीत पीएसबींच्या एकूण गुणांमध्ये स्कोअरमध्ये 37%वाढ झाली असून, सरासरी ईएएसई निर्देशांक 49.2 वरून 67.4 पर्यंत सुधारला आहे. सर्वाधिक प्रगती सुधारणा कार्यक्रमाच्या सहा संकल्पनांमध्ये दिसून आली. . 'रिस्पॉन्सिबल बँकिंग', 'गव्हर्नन्स अँड एचआर', 'एमएसएमईसाठी उद्यमीमित्र म्हणून पीएसबी' आणि 'क्रेडिट ऑफ टेक' या संकल्पनांमध्ये सर्वाधिक सुधारणा दिसून आली.

पीएसबींनी सर्व क्षेत्रात तंत्रज्ञान -सक्षम, स्मार्ट बँकिंग पद्धती स्वीकारली आहे. कर्जाच्या कमी वेळेसाठी किरकोळ आणि एमएसएमई कर्ज व्यवस्थापन प्रणाली स्थापन केली आहे आणि डिजिटल कर्जपुरवठयासाठी 59 मिनीटात कर्ज सुविधा सुरु केली आहे. पीएसबींनी किरकोळ आणि एमएसएमई ग्राहकांना त्यांच्या कर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी सुविधा दिली आहे. बहुतांश शाखा-आधारित सेवा आता स्थानिक भाषांमध्ये घरी आणि मोबाइलवरून उपलब्ध आहेत.

ईएएसई सुधारणा निर्देशांकाने प्रभावी शासन कारभारासाठी संचालक मंडळ आणि नेतृत्व स्थापित केले आहे, जोखीम फ्रेमवर्क तयार केले आहे, तंत्रज्ञान- आणि डेटा-आधारित जोखीम मूल्यांकन आणि प्रुडेन्शियल अंडररायटींग व प्राइसिंग सिस्टम, पूर्वसूचना इशारा (ईडब्ल्यूएस) प्रणाली आणि कालबद्ध कृतीसाठी विशेष देखरेखीची व्यवस्था केली आहे.

ईएएसई 2.0 निर्देशांक निकालानुसार बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पूर्वीच्या ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांना ‘सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बँका’ श्रेणीत अव्वल तीन स्थानावर असल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पूर्वीचे कॉर्पोरेशन बँक यांना ‘टॉप इम्प्रोव्हर्स’ श्रेणी आधारे ईएएसई २.० निर्देशांकात गौरविण्यात आले. निवडक संकल्पनांमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक यांची दखल घेण्यात आली.

डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिसेससाठी आणि ईएएसई 2.0 निर्देशांकाच्या निकालाची घोषणा पुढील लिंकवर उपलब्ध आहे- https://www.iba.org.in/events/past-events/launch-of-dsb-and-declaration-of-ease-2-0-index -results_972.htmlor https://www.iba.org.in

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1652836) Visitor Counter : 357