निती आयोग

अटल इनोव्हेशन मिशनकडून आत्मनिर्भर भारत अराईज-एएनआयसी उपक्रमाची सुरुवात


इस्रो आणि चार मंत्रालयांचा सहभाग

Posted On: 09 SEP 2020 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

 

अटल इनोव्हेशन मिशन (AIM) अंतर्गत नीती आयोगाने आज बहुप्रतीक्षीत कार्यक्रम- आत्मनिर्भर भारत, अराईज-अटल न्यू इंडिया आव्हान कार्यक्रमाची, भारतीय एमएसएमई आणि स्टार्टअपसमध्ये उपयोजित संशोधन आणि नवकल्पनेला उत्तेजन देण्यासाठी सुरुवात केली आहे.

भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था (इस्रो), संरक्षण, अन्न प्रक्रिया उद्योग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार या चार मंत्रालयाच्या आणि संबंधित उद्योगांच्या सहकार्याने उद्योगांना येणाऱ्या समस्यांचे नवकल्पना उपायांच्या माध्यमातून निराकरण करण्यासंदर्भात हा उपक्रम आहे.

कार्यक्रमाच्या आभासी उद्‌घाटनाप्रसंगी नितीन गडकरी म्हणाले, एमएसएमई देशाच्या विकासाचे इंजिन आहे आणि त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. या उपक्रमामुळे या क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध उपक्रम आणि नवकल्पना हाती घेतल्या जातील, याचा मला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण वैज्ञानिक संशोधनावर भर देण्यासंबंधी आहे, त्याविषयी बोलताना गडकरी म्हणाले, विज्ञानाने सामाजिक-आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मदत करावी आणि वैज्ञानिक संशोधनाचा प्रयोगशाळांमधून प्रत्यक्ष जमीनीवर विस्तार करावा. 

नितीन गडकरींच्या मताशी सहमती दर्शवताना नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार म्हणाले, जे तंत्रोजक (टेक्नोप्रिनर) देशाचा विकास करण्यास सक्षम आहेत, त्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मदत केली जाईल. 

आत्मनिर्भर भारत अराईज-एएनआयसी कार्यक्रमांतर्गत उपयोजित-संशोधनावर आधारीत नवकल्पनांना प्रस्तावित तंत्रज्ञान उपाय किंवा उत्पादनासाठी 50 लाख रुपयांचा अर्थपुरवठा करण्यात येईल.

याप्रसंगी बोलताना नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले, इस्रोने तंत्रज्ञानाचा नेहमीच पुरस्कार केला आहे. मात्र, विविध विभाग आणि मोठ्या कंपन्यांनी अप्रतिम कार्य करणाऱ्या नवीन स्टार्टअप्सना कधीच प्रोत्साहन दिले नाही. अराईज-एएनआयसीच्या यशासाठी सरकारच प्रथम खरेदीदार झाले पाहिजे.

प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रो. विजय राघवन याप्रसंगी म्हणाले, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगत उत्पादनांची आवश्यकता असली तरी त्या वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणे तितकेच महत्वाचे आहे. सरकारच्या बदललेल्या धोरणांमुळे हे आता शक्य झाले आहे. आता हे राज्य सरकारांच्या खरेदी यंत्रणांमध्ये ओसरण्याची आवश्यकता आहे आणि देशात निर्माण झालेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवण्याची संधी दिली पाहिजे अराईज उपक्रमाला वैज्ञानिक बाजूने आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे ते म्हणाले.

अराईज-एएनआयसीचा महत्वाचा भाग असलेल्या इस्रोचे अध्यक्ष डॉ के शिवन म्हणाले, इस्रोने नेहमीच एमएसएमई क्षेत्राला पाठिंबा दिला आहे. मला खात्री आहे, की बर्‍याच स्टार्टअप्स आणि एमएसएमई आहेत ज्यांना त्यांच्या कल्पनांना व्यवहार्य उत्पादनांमध्ये रूपांतरित करण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे आणि या उपक्रमाने आम्ही हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी उत्सुक आहोत.  

एआयएमचे संचालक आर. रामानंद म्हणाले की, एमएमएमई क्षेत्र जलद विकास होणारे क्षेत्र आहे. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यात याची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे.  वैशिष्ट्ये:

  • इस्रो अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत 100 अटल टिंकरींग प्रयोगशाळा घेणार आहे.
  • महात्मा गांधी आव्हान पध्दतीचा वापर करून नाविन्यपूर्ण लोकांना आकर्षित करण्यावर अधिकाऱ्यांनी भर
  • नितीन गडकरी यांनी एमएसएमई क्षेत्राचा विस्तार अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अराईज-एएनआयसी उपक्रमाच्या माध्यमातून करण्यावर भर दिला.

 

B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652824) Visitor Counter : 230