राष्ट्रपती कार्यालय
सिंगापूरच्या राजदूतांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विश्वासार्हतेचे पत्र सादर
Posted On:
10 SEP 2020 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2020
राष्ट्रपती, श्री राम नाथ कोविंद यांनी सिंगापूर येथे उच्चायुक्त म्हणून नियुक्त केलेले श्री सायमन वोंग वी कुएन यांच्याकडून आज (10 सप्टेंबर 2020) एका व्हर्च्युअल (आभासी) कार्यक्रमात विश्वासार्हतेचे पत्र (लेटर ऑफ क्रेडेंशियल्स) स्वीकारले.
समारंभानिमित्त बोलताना, राष्ट्रपतींनी उच्चायुक्तांना त्यांच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. अलिकडेच यशस्वीपणे पार पडलेल्या झालेल्या निवडणुकांबद्दल सिंगापूर सरकारचे अभिनंदन केले. भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध दृढ होत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह बहुपक्षीय मंचांवर भारताला सशक्त पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सिंगापूरचे आभार मानले. कोविड – 19 महामारीच्या काळात दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील मैत्री आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.
* * *
B.Gokhale/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1652963)
Visitor Counter : 206