PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 28 MAY 2020 7:52PM by PIB Mumbai

 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

दिल्ली-मुंबई, 28 मे 2020

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती  

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सोबत भारत सरकार श्रेणीबद्ध, पूर्व नियोजित आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अनेक पावले उचलत आहे. उच्च स्तरावर याविषयी नियमितपणे पुनरावलोकन आणि परीक्षण केले जात आहे.

सक्रिय वैद्यकीय देखरेखीखाली असलेल्या रुग्णांची संख्या  86,110 आहे. आतापर्यंत एकूण 67,691 लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3,266 रूग्ण बरे झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 42.75% झाला आहे.

 

इतर अपडेट्स:

  • कॅबिनेट सचिवांनी 13 कोविड -19 बाधित शहरांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तिथल्या जिल्हा दंडाधिकारी, नगरपालिका आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेतली. संबंधित सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव बैठकीला उपस्थित होते.  ही बैठक महत्वपूर्ण होती कारण ही 13 शहरे सर्वाधिक कोरोना विषाणू बाधित ठिकाणे असून देशातील सुमारे 70 टक्के बाधित रुग्ण या शहरांमध्ये आहेत. या 13 शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, दिल्ली / नवी दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता / हावडा, इंदूर (मध्य प्रदेश), जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर (तमिळनाडू) यांचा समावेश आहे. कोविड -19 बाधित रुग्णांच्या  व्यवस्थापनासाठी महानगरपालिकांच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा या  बैठकीत घेण्यात आला.
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएम-जीकेवाय) राज्य/केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 4.57 लाख मेट्रिक टन डाळ पाठविली आहे. राज्य/केंद्रशासित प्रदेशातील 1340.61 लाख लाभार्थ्यांना यापैकी 1.78 लाख मेट्रिक टन डाळींचे वाटप करण्यात आले आहे. रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2020-21 मध्ये एफसीआय मध्ये एकूण 359.10 लाख मेट्रिक टन गव्हाची आवक झाली असून त्यापैकी 347.54 लाख मेट्रिक टन खरेदी झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत 24 मार्च 2020 पासून आतापर्यंत लॉकडाऊन कालावधीत 9.67 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून आतापर्यंत 19,350.84 कोटी रुपये वितरीत केले आहेत.
  • भारतीय रेल्वेने दि. 27 मे  2020 पर्यंत संपूर्ण देशभरामध्ये एकूण 3543 ‘‘श्रमिक विशेष’’ गाड्या चालविल्या. दि. 26 मे, 2020 रोजी एकूण 255 ‘‘श्रमिक विशेष’’ गाड्या सोडण्यात आल्या. गेल्या 26 दिवसांमध्ये 48 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांना त्यांच्या गृहराज्यांमध्ये पोहोचवण्याचे कार्य भारतीय रेल्वेने केले आहे. या 3543 गाड्या मूळ वेगवेगळ्या राज्यांच्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त गाड्या असलेली पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुढील प्रमाणे आहेत. गुजरात (946 गाड्या), महाराष्ट्र (677 गाड्या), पंजाब (377 गाड्या), उत्तर प्रदेश (247 गाड्या) आणि बिहार (215 गाड्या)
  • न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीला केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिल्या. एनडीबीच्या नव्या  अध्यक्षाची निवड, उपाध्यक्षांची  आणि मुख्य जोखीम अधिकारी यांची  नियुक्ती आणि सदस्यत्वाचा विस्तार यांचा बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत समावेश होता. 2014 मधे ब्रिक्स नेत्यांनी मांडलेल्या दृष्टीकोनाला अतिशय लवकर आकार  देण्यात उत्कृष्ट नेतृत्व प्रदान केल्याबद्दल एनडीबीचे मावळते अध्यक्ष के.व्ही.कामथ यांची वित्त मंत्र्यांनी प्रशंसा केली. कोविड-19 संदर्भात तात्काळ प्रतिसाद देत कोविड-19 आपत्कालीन कार्यक्रम ऋण  संदर्भातले त्यांचे योगदानही स्मरणात राहील असे त्या म्हणाल्या.
  • केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज पॅन (PAN) तात्काळ (रियल टाइम) देण्याच्या सुविधेचा  प्रारंभ केला. वैध आधार क्रमांक आणि 'आधार'कडे नोंदविलेला मोबाईल क्रमांक असलेल्या व्यक्तींनी पॅन (PAN) साठी अर्ज केला असेल, त्यांना आता ही सुविधा उपलब्ध असेल. पॅन देण्याची ही प्रक्रिया कागदविरहित असून अर्जदारांना इलेक्ट्रॉनिक म्हणजेच इ-पॅन विनामूल्य देण्यात येत आहे.
  • केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्योग व व्यापार संघटनांसमवेत बैठक घेतली. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर केलेली टाळेबंदी आणि त्यानंतर त्यांच्या कार्यात दिलेली शिथिलता या गोष्टींचा परिणाम जाणून घेण्यासाठी आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याच्या त्यांच्या सूचनांची दखल घेण्यासाठी टाळेबंदीनंतरची संघटनांसोबतची ही पाचवी बैठक होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधताना श्रीलंकेच्या संसदेत त्यांना 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. उभय नेत्यांनी सध्या सुरु असलेल्या कोविड-19 साथीच्या आजाराचा आरोग्यावर आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवर आणि त्याचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये घेत असलेल्या उपायांवर चर्चा केली. या आव्हानात्मक काळात भारत श्रीलंकेला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांना दिले.
  • राष्ट्रीय विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान परीषदेचा(NCSTC) विज्ञान तंत्रज्ञान विभाग(DST) आणि डॉ अनामिका मेमोरियल ट्रस्ट यांनी मिळून कोविड-19 महामारीची ए टू झेड ( सर्वंकश ) माहिती देणार्या लोकप्रिय मल्टिमीडीया मार्गदर्शिकेची हिन्दी आवृत्ती काढली आहे. या महिन्याच्या सुरूवातीलाच त्याची इंग्रजी प्रत प्रसिध्द झाली आहे . हिन्दी भाषिक भागातून कोविड कथाच्या आवृतीची जोरदार मागणी झाल्याने ही हिंदी आवृत्ती प्रकाशित झाली असून त्यात लोकांना उपयुक्त अधिक माहिती दिली आहे. “सामान्य माणसांना विज्ञानाचे आकलन त्यांच्या भाषेतून करून दिले पाहिजे आणि हिंदी ही बहुसंख्यांची बोलीभाषा आहे  म्हणून कोविड कथा चे महत्व अधिक आहे”  असे डिएसटीचे सचिव प्रा आशुतोष शर्मा याची प्रशंसा करताना सांगितले.
  • एडीबी अर्थात आशियाई विकास बँक भारत सरकार यांनी आज महाराष्ट्रातल्या 450 किलोमीटर राज्य महामार्ग तसेच महत्वाच्या जिल्हा मार्ग सुधारणा कामासाठी 177 दशलक्ष डॉलर्सच्या ऋण करारावर स्वाक्षऱ्या केल्या. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी, समीर कुमार खरे, अतिरिक्त सचिव (फंड बँक एडीबी), आर्थिक व्यवहार विभाग, अर्थ मंत्रालय यांनी भारत सरकारच्या वतीने तर, एडीबीचे ‘इंडिया रेसिडन्ट मिशन’चे भारतातील संचालक केनीची योकोयामा यांनी एडीबीच्या वतीने यावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • कामगार कल्याणासंबंधित अद्ययावत संख्यिकी-आकडेवारीचा तपशील सर्वांना मिळावा, या उद्देशाने कामगार आणि रोजगार (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी ‘लेबर ब्युरो’मध्ये काल ‘@लेबरडीजी’(@LabourDG) या व्टिटर हँडलचे उद्घाटन केले. याप्रसंगी कामगार आणि रोजगार सचिव हीरालाल समारिया आणि एसएलईए आणि ‘लेबर ब्युरो’चे महासंचालक डीपीएस नेगी उपस्थित होते. ‘या व्टिटर हँडलवर भारतीय कामगार बाजारपेठेच्या निर्देशांचे ‘स्नॅपशॉट’च्या स्त्रोतांची नियमित आणि अद्ययावत माहिती देण्यात येईल’, असे पहिले व्टिट मंत्र्यांनी केले.

 

महाराष्ट्र अपडेट्स

 

 

PIB FACT CHECK

  

 

* * *

RT/ST/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1627495) Visitor Counter : 249