श्रम आणि रोजगार मंत्रालय
@LabourDG (अॅटलेबरडीजी) या व्टिटर हँडलचे संतोष गंगवार यांच्या हस्ते उद्घाटन
कामगार कल्याणासंबंधित अद्ययावत संख्यिकी-आकडेवारीचा तपशील या हँडलव्दारे देणार
Posted On:
28 MAY 2020 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2020
कामगार कल्याणासंबंधित अद्ययावत संख्यिकी-आकडेवारीचा तपशील सर्वांना मिळावा, या उद्देशाने कामगार आणि रोजगार (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी ‘लेबर ब्युरो’मध्ये काल ‘@लेबरडीजी’(@LabourDG) या व्टिटर हँडलचे उद्घाटन केले. याप्रसंगी कामगार आणि रोजगार सचिव हीरालाल समारिया आणि एसएलईए आणि ‘लेबर ब्युरो’चे महासंचालक डीपीएस नेगी उपस्थित होते. ‘या व्टिटर हँडलवर भारतीय कामगार बाजारपेठेच्या निर्देशांचे ‘स्नॅपशॉट’च्या स्त्रोतांची नियमित आणि अद्ययावत माहिती देण्यात येईल’, असे पहिले व्टिट मंत्र्यांनी केले.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाशी संलग्न असलेल्या लेबर ब्युरोच्यावतीने कामगारांसंबंधित वेगवेगळी माहिती जमा करण्यात येत असते. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या श्रमिकांना मिळणारी मजुरी, मिळकत, उत्पादकता, अनुपस्थिती, कामगारांच्या क्षेत्रामध्ये होणारी उलाढाल, औद्योगिक संबंध, त्यांच्या कामाचे स्वरूप आणि राहणीमान, तसेच विविध कामांच्या प्रकारानुसार त्यांचे होणारे मूल्यांकन यासारख्या वेगवेगळ्या माहितीचे संकलन करण्याचे आणि तसेच ही माहिती प्रसारित करण्याचे काम केले जाते. लेबर ब्युरोव्दारे प्रसारित केलेल्या माहितीच्या आधारे देशामध्ये रोजगारविषयक धोरणे, कार्यपद्धती तसेच कामगारविषयक अधिनियम करून त्यांची अंमलबजावणी करण्यासंबंधी सरकारला शिफारसी, सल्ले देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले जाते. लेबर ब्युरोकडे निर्देशांकांच्या संकलनाचे महत्वाचे काम असते. तसेच कामगार संबंधित आकडेवारी संग्रहित करण्यासाठी सर्व्हेक्षणही केले जाते. प्रशासकीय कर्मचारी या आकडेवारी संकलन आणि प्रसारणाचे काम करतात. या कामासाठी ‘लेबर फोर्स सर्व्हे अँड एंटरप्राइस सर्व्हे’ प्रामुख्याने कार्यरत असते. ही संस्था कामगारांसंबंधीचा निर्देशांक काढते.
भारतामध्ये लेबर ब्युरोची स्थापना 1946 मध्ये झाली. लेबर ब्युरोच्या दोन मुख्य शाखा - चंदिगड आणि सिमला येथे कार्यरत आहेत. तसेच अहमदाबाद, कानपूर, कोलकाता, गुवाहाटी आणि चेन्नई या पाच ठिकाणी ब्युरोची प्रत्येकी एक क्षेत्रीय कार्यालये आहेत. तसेच मुंबईमध्ये उप-प्रादेशिक कार्यालय आहे. या कार्यालयांच्या कामकाजांचे नियंत्रण महा संचालक करतात. तसेच भारतीय आर्थिक सेवा (आयईएस) आणि भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) च्या अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिका-यांचा समूह यासाठी कार्यरत आहे.
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1627447)
Visitor Counter : 282