कृषी मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        पीएम-जीकेवाय अंतर्गत राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 13.4 कोटी लाभधारकांना 1.78 लाख मेट्रिक टन डाळींचे वाटप
                    
                    
                        
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लॉकडाऊन कालावधीत 9.67कोटी शेतकऱ्यांना 19,350.84 कोटी रुपये वितरीत
                    
                
                
                    Posted On:
                27 MAY 2020 7:54PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 27 मे 2020
पीएम-जीकेवाय योजनेंतर्गत डाळींचे वाटप 
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएम-जीकेवाय) राज्य/केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 4.57 लाख मेट्रिक टन डाळ पाठविली आहे. राज्य/केंद्रशासित प्रदेशातील 1340.61 लाख लाभार्थ्यांना यापैकी 1.78 लाख मेट्रिक टन डाळींचे वाटप करण्यात आले आहे. 
लॉकडाऊन कालावधीत नाफेड कडून डाळी आणि तेलबियांच्या खरेदीची स्थिती:
	- आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश आणि हरियाणा या 9 राज्यांमधून 7.33 लाख मेट्रिक टन चण्याची खरेदी करण्यात आली आहे.
 
	- राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात आणि हरयाणा या 5 राज्यांमधून 5.91 लाख मेट्रिक टन मोहरी खरेदी केली आहे. 
 
	- तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात आणि ओदिशा या 8 राज्यांमधून 2.41 लाख मेट्रिक टन तूर खरेदी केला आहे. 
 
रब्बी विपणन हंगामात गव्हाची खरेदी 
रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2020-21 मध्ये एफसीआय मध्ये एकूण 359.10 लाख मेट्रिक टन गव्हाची आवक झाली असून त्यापैकी 347.54 लाख मेट्रिक टन खरेदी झाली आहे. 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत 24 मार्च 2020 पासून आतापर्यंत लॉकडाऊन कालावधीत 9.67 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून आतापर्यंत 19,350.84 कोटी रुपये वितरीत केले आहेत.  
 
B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar
 
 
 
 
 
 
 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1627255)
                Visitor Counter : 340