पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2020 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधताना श्रीलंकेच्या संसदेत त्यांना 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी राजपक्षे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत श्रीलंकेच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा पुनरुच्चार करत त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
श्रीलंकेतील भारतीय वंशाचे तामिळ ज्येष्ठ नेते अरुमुगन थोंडमन यांच्या काल, अचानक आणि अकाली झालेल्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील विकास भागीदारी पुढे नेण्यासाठी थोंडामन यांनी घेतलेल्या भूमिकेची पंतप्रधानांनी आठवण काढली.
उभय नेत्यांनी सध्या सुरु असलेल्या कोविड-19 साथीच्या आजाराचा आरोग्यावर आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवर आणि त्याचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये घेत असलेल्या उपायांवर चर्चा केली. या आव्हानात्मक काळात भारत श्रीलंकेला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांना दिले.
* * *
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1627368)
आगंतुक पटल : 294
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam