अर्थ मंत्रालय
न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीला निर्मला सीतारामन यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती
Posted On:
27 MAY 2020 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2020
न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीला केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिल्या. एनडीबीच्या नव्या अध्यक्षाची निवड, उपाध्यक्षांची आणि मुख्य जोखीम अधिकारी यांची नियुक्ती आणि सदस्यत्वाचा विस्तार यांचा बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत समावेश होता.
पायाभूत विकासासाठी निधी पुरवण्यामध्ये एनडीबीच्या योगदानाची वित्त मंत्र्यांनी प्रशंसा केली.या योगदानामुळे भारतासह सदस्य राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमावर सकारात्मक परिणाम झाला आहे. अल्पावधीत एनडीबीने सदस्य राष्ट्रांच्या 16.6 अब्ज डॉलर्स किंमतीच्या बार 55 प्रकल्पांना मंजुरी दिली असून ही लक्षणीय कामगिरी आहे. बँकेने यशस्वीरित्या स्वतःचे स्थान निर्माण केले असून एमडीबी च्या बरोबरीने अभिमानाने ही बँक उभी असल्याचा उल्लेख सीतारामन यांनी केला.
2014 मधे ब्रिक्स नेत्यांनी मांडलेल्या दृष्टीकोनाला अतिशय लवकर आकार देण्यात उत्कृष्ट नेतृत्व प्रदान केल्याबद्दल एनडीबीचे मावळते अध्यक्ष के.व्ही.कामथ यांची वित्त मंत्र्यांनी प्रशंसा केली. कोविड-19 संदर्भात तात्काळ प्रतिसाद देत कोविड-19 आपत्कालीन कार्यक्रम ऋण संदर्भातले त्यांचे योगदानही स्मरणात राहील असे त्या म्हणाल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष ब्राझिलचे मार्कोस ट्रोयजो आणि उपाध्यक्ष आणि सीआरओ म्हणून नव्याने नियुक्त झालेले भारताचे अनिल किशोरा यांचे वित्त मंत्र्यांनी अभिनंदन केले. ही गती कायम राखण्यात आणि सदस्यांना कर्ज पुरवण्यासंदर्भातली कामगिरी, पारदर्शकता, आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता आणि एनडीबीचे अधिकार प्रभावीपणे साध्य करण्यात नवी उंची गाठण्याबाबत एनडीबीच्या नव्या नेतृत्वाकडून आपल्या मोठ्या अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या.ब्रिक्स मूल्यांचे जतन आणि जागतिक विकासात्मक संस्था म्हणून एनडीबीचा विकास ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यावर लक्ष राखायला हवे असे त्यांनी सुचवले.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1627263)
Visitor Counter : 285