PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


कोविड-19 वर HCQ औषधाचा प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक परिणाम काय होतो यावर एम्समध्ये अध्ययन सुरु आहे: ICMR

RT-PCR चाचणी ही कोविड-19 साठीची सर्वोत्तम फ्रंटलाईन टेस्ट आहे. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट चा प्राथमिक उपयोग केवळ एखाद्या भागात विषाणूचा प्रादुर्भाव किती आहे, हे जाणण्यासाठी आहे: ICMR

Posted On: 18 APR 2020 7:48PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, April 18, 2020

 

सध्याच्या कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्‌भवणाऱ्या संधीचा फायदा घेऊन भारतीय कंपन्यांचे संपादन/हस्तांतरणाची शक्यता टाळण्यासाठी सरकारने विद्यमान थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) धोरणाचा आढावा घेतला आणि एकत्रित एफडीआय धोरण, 2017 मध्ये समाविष्ट असलेल्या विद्यमान एफडीआय धोरणाच्या परिच्छेद 3.1.1 मध्ये सुधारणा केली आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवर पत्रकार परिषद 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव आणि ICMR चे प्रवक्ते श्री रमन गंगाखेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.

  • जे परदेशी नागरिक कोविड-19 च्या प्रसारामुळे भारतात अडकले आहेत आणि ज्यांच्या व्हिसाची मुदत संपली आहे किंवा संपणार आहे, त्यांच्या व्हिसाची मुदत 3 मे 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत नि:शुल्क वाढवली जात आहे, मात्र त्यासाठी त्यांनी ऑनलाइन अर्ज करायला हवा आहे.- गृह मंत्रालय
  • अडकलेल्या काही परदेशी नागरिकांनी त्यांच्या मायदेशी जाण्याची विनंती केली, तर 3 मे 2020 नंतर चौदा दिवसांनी म्हणजेच 17 मे 2020 पर्यंत त्यांना मायदेशी जाण्याची परवानगी दिली जाईल, या लांबलेल्या कालावधीबद्दल त्यांच्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही.
  • केंद्र आणि राज्ये या दोघांनीही नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. सर्व राज्यांनी राज्ये व जिल्हा आकस्मिक केंद्रे सुरू केली आहेत. श्रम मंत्रालयाने मजुरांच्या समस्या सोडवण्यासाठी 20 नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत
  • गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातून 24/7 सेवा दिली जात आहे; आमचे नवे टोल फ्री क्रमांक 1930 आणि 1944 यावरही नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले जात आहे. एक आपत्कालीन क्रमांक 112 सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कार्यरत आहे; यावर पोलीस, अग्निशमन आणि अम्ब्युलन्स सेवा घेता येतील
  • एकल आपत्कालीन क्रमांक 112 लोकेशन आधारित ट्रॅकिंग करतो आणि अत्यंत जलदगतीने सेवा दिली जाते. कोविड-19 च्या काळात या क्रमांकाचा नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.
  • केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी काल दिल्लीचे नायब राज्यपाल, दिल्लीचे आरोग्यमंत्री, दिल्लीमधील विविध रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक आणि केंद्र आणि दिल्ली सरकारचे आरोग्य अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली.- आरोग्य मंत्रालय
  • कोविड-19 च्या व्यतिरीक्त इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांचीही काळजी आणि उपचार करण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयाने सर्व रुग्णालयांना केले आहे. तसेच स्वयंसेवी रक्तदात्यांना प्रोत्साहन देऊन, पुरेशा रक्तसाठ्याची व्यवस्था ठेवण्यासही सांगितले आहे.
  • आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या -1992, एकूण रुग्णसंख्येच्या 13.85%. गेल्या 24 तासांत - 991 नवे रुग्ण आले असून 43 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या -14,378. एकूण मृत्यू- 480.
  • आम्ही फिल्ड लेवलवर केलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम मिळत आहेत. माहे सोबतच, कर्नाटकमधील कोडागू या जिल्ह्यात देखील गेल्या 28 दिवसात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. 23 राज्यातील 45 इतर जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही.
  • आतापर्यंत देशात कोविडचा मृत्यूदर 3.3 % असून वयानुसार प्रमाण खालीलप्रमाणे:
    • 0-45 - 14.4 %
    • 45-60 -10.3 %
    • 60-75 -33.1%
    • 75 च्यावर- 42.2 %
    • ~75 टक्के मृत्यू 60 वर्षं वयाच्या वरच्या रुग्णांचे झाले आहेत
    • 83 % मृत्यूंमध्ये रुग्णांना इतर काही आजार असल्याचेही आढळले आहे
  • कोविड-19 च्या 14,378 पैकी 4291 किंवा सुमारे 29.8% पॉझिटिव्ह रुग्ण एकाच स्रोतापासून म्हणजे निझामुद्दीन मरकझ समूहातून निर्माण झाले असल्याचे आढळले आहे
  • RT-PCR चाचणी ही कोविड-19 साठीची सर्वोत्तम फ्रंटलाईन टेस्ट आहे, अँटी बॉडी टेस्ट त्याची जागा घेऊ शकत नाही. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट चा प्राथमिक उपयोग केवळ एखाद्या भागात विषाणूचा प्रादुर्भाव किती आहे, हे जाणण्यासाठी होतो.
  • रॅपिड अँटीबॉडी टेस्टचा वापर हॉटस्पॉट मध्ये केला जाणार आहे; त्यांचा वापर देखरेख करण्यासाठी आणि ज्या भागात आतापर्यंत कोविड-19 रुग्ण आढळले नाहीत अशा भागात देखील संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी करता येणार आहे.
  • कोविड19 साठी देशाचे चाचण्यांसाठीचे धोरण आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याच धोरणानुसार, सर्व प्रकारातल्या वेगवेगळ्या व्यक्तींची चाचणी केली जाणार आहे.
  • हॉट स्पॉट भागांमध्ये कोविड-19 च्या चाचण्यांसाठी भारताने निश्चित केलेला अल्गोरिदम/ धोरण इथे पाहता येईल.
  • कासरगोड यशगाथा 
  • केरळच्या कासरगोड जिल्ह्यातल्या कोविड19 च्या एकूण 168 रुग्णांपैकी, 113 पूर्ण बरे झाले आहेत. योग्य वैद्यकीय व्यवस्थापन केल्यामुळे एकाही बाधित रुग्णाचा मृत्य झालेला नाही. उर्वरित रुग्णांवर देखील योग्य उपचार आणि देखरेख सुरु आहे.
  • केरळमधील कासरगोड जिल्ह्यात परदेश प्रवास करून आलेल्यांची संख्या, भौगोलिक स्थान आणि मोठ्या प्रमाणावर असलेले परदेशी काम करणारे नागरिक यामुळे अनेक आव्हाने निर्माण झाली होती, मात्र या जिल्ह्याने या आव्हानांना चांगल्या प्रकारे तोंड दिले
  • कोविड19 शी लढा देताना, केरळच्या कासरगोड जिल्ह्याने जी धोरणात्मक पावले उचलली, त्या अंतर्गत, उत्तम समन्वयासाठी त्यांनी विशेष राज्य अधिकारी देखील नियुक्त केला होता
  • भू-अवकाश ट्रॅकिंग व्यवस्था वापरुन गृह विलगीकरणात असलेल्यांचे ट्रॅकिंग , सामाजिक अंतर नियमांना प्रोत्साहन देण्यासाठी संक्रमण साखळी तोडण्याची मोहीम, ड्रोनचा वापर, इंसिडन्ट कमांडर्स आदी उपाययोजना कासरगोड जिल्ह्यात करण्यात आल्या.
  • 17,300 हून अधिक संपर्कांचा माग काढण्यात आला आणि त्यांचे विलगीकरण करण्यात आले, अतिशय तातडीने चाचण्या करण्यात आल्या, कोविड केअर सेंटर्स आणि ICU केंद्रे उभारण्यात आली.
  • गरीब आणि गरजू व्यक्तींना काही त्रास होऊ नये, यासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले. त्यांना मोफत अन्न वितरित केले गेले, नियमित तपासण्याही करण्यात आल्या.
  • या जिल्ह्याच्या कोविड-19 व्यवस्थापनात एक महत्त्वाची उपाययोजना करण्यात आली आणि ती म्हणजे सर्व  प्राथमिक आणि द्वितीय  संपर्क आणि अती जोखीम असलेल्या रुग्णांचे अलगीकरण केंद्रात विलगीकरण करण्यात आले.
  • केरळच्या कासरगोड मधून, कोविड19 च्या आजारातून पूर्ण बरे होऊन जेव्हा रुग्ण परत आले, तेव्हा आम्हाला अत्यंत सकारात्मक उत्साह वाढवणारा प्रतिसाद मिळाला. आपल्याला ही लढाई लढण्यासाठी एक समाज आणि एक सरकार असा दृष्टिकोन ठेवून काम करावे लागणार आहे.
  • हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची(HCQ) परिणामकारकता तपासून पाहाण्यासाठी 8 आठवड्यांच्या अभ्यासासाठी सुमारे 480 रुग्णांची नोंदणी करण्यात येईल. HCQचे आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या side-effects विषयी वेगळ्या प्रकारचे संशोधन सुरू आहे. ज्यांनी आधीपासून HCQ घ्यायला सुरुवात केली होती त्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माहितीचा वापर केला जाणार आहे
  • कोविड19 वर HCQ औषधाचा प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक परिणाम काय होतो यावर एम्समध्ये अध्ययन सुरु आहे. म्हणजेच, या औषधाची प्रतिबंध आणि उपचार याबद्दलची क्षमता तपासली जात आहे.
  • अध्ययनातून असे आढळले आहे, 68% कोरोना रुग्णांमध्ये remdesivir या औषधामुळे ऑक्सिजनची गरज कमी होते. त्याचे उत्पादक GileadSciences यांच्या म्हणण्यानुसार, त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र, त्याबद्दलच्या अंतरिम अध्ययनानंतरची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही. येत्या काही आठवड्यांमध्ये remdesivir गुणकारी असल्याचे आढळले तर ते patent pooling मध्ये समाविष्ट होईल किंवा ते उपलब्ध झाले तर आम्ही त्याच्या चाचण्या सुरू करू शकू. त्याशिवाय remdesivir शी संबंधित असलेल्या जागतिक आरोग्य संस्थेच्या  Solidarity Trial मध्ये भारत देखील सहभागी झाला आहे - ICMR

वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इतर अपडेट्‌स:

महाराष्ट्र अपडेट्स

संसर्ग आणि मृत्यू या दोन्ही बाबतीत सर्वात प्रभावीत ठरलेल्या महाराष्ट्र राज्यात कोविड-19 केसेसची संख्या 3323 झाली आहे भारतीय नौदलाचे किमान वीस नौसैनिक मुंबईमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते आयएनएस आंग्रे वर तैनात होते जी नौदलाच्या पश्चिम कमांड अंतर्गत येते

***

 

DJM/RT/MC/SP/PM

 

 



(Release ID: 1615829) Visitor Counter : 473