• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
नागरी उड्डाण मंत्रालय

देशभरात आवश्यक वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी लाईफलाईन उडान अंतर्गत 274 विमानांचे उड्डाण

Posted On: 18 APR 2020 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2020

 

कोविड -19 विरुद्धच्या भारताच्या लढ्याला पाठिंबा म्हणून आवश्यक तो वैद्यकीय माल देशाच्या दुर्गम भागात नेण्यासाठी ‘लाईफलाईन उडान’ विमाने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयामार्फत चालविली जात आहेत. एअर इंडिया, अलायन्स एअर, आयएएफ आणि खाजगी वाहकांमार्फत लाईफलाईन उडान अंतर्गत 274 विमाने चालविली गेली आहेत. यापैकी 175 उड्डाणे एअर इंडिया आणि अलायन्स एअरने चालविली आहेत. आजपर्यंत या विमानांद्वारे झालेली मालवाहतूक सुमारे 463.15 टन आहे. आजपर्यंत लाईफलाईन उडान विमानांनी कापलेले हवाई अंतर 2,73,275 किमी पेक्षा जास्त आहे.

लाईफलाईन उडान विमानांचा तारीखवार तपशील खालीलप्रमाणे आहे.

S No

Date

Air India

Alliance

IAF

Indigo

Spice Jet

Total

1

26.3.2020

2

-

-

-

2

4

2

27.3.2020

4

9

1

-

-

14

3

28.3.2020

4

8

-

6

-

18

4

29.3.2020

4

9

6

-

-

19

5

30.3.2020

4

-

3

-

-

7

6

31.3.2020

9

2

1

-

-

12

7

01.4.2020

3

3

4

-

-

10

8

02.4.2020

4

5

3

-

-

12

9

03.4.2020

8

-

2

-

-

10

10

04.4.2020

4

3

2

-

-

9

11

05.4.2020

-

-

16

-

-

16

12

06.4.2020

3

4

13

-

-

20

13

07.4.2020

4

2

3

-

-

9

14

08.4.2020

3

-

3

-

-

6

15

09.4.2020

4

8

1

-

-

13

16

10.4.2020

2

4

2

-

-

8

17

11.4.2020

5

4

18

-

-

27

18

12.4.2020

2

2

-

-

-

4

19

13.4.2020

3

3

3

-

-

9

20

14.4.2020

4

5

4

-

-

13

21

15.4.2020

2

5

-

-

-

7

22

16.4.2020

9

-

6

-

-

15

23

17.4.2020

4

8

-

-

-

12

 

Total

91

84

91

6

2

274

पवन हंस लि.सह हेलिकॉप्टर सेवा, जम्मू-काश्मीर, लडाख, बेटे आणि ईशान्य भागात महत्त्वाचे वैद्यकीय साहित्य आणि गंभीर रूग्णांची ने-आण करीत आहेत.

देशांतर्गत ‘लाईफलाईन उडान’ विमाने हब आणि स्पोक मॉडेलमध्ये कार्य करतात. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू आणि गुवाहाटी येथे मालवाहतूक हब स्थापित केले गेले आहेत. लाईफलाईन उडान विमाने या मालवाहतूक केंद्रांना दिब्रूगड, अगरतला, ऐझवाल, दिमापूर, इंफाळ, जोरहाट, लेंगपुई, म्हैसूर, नागपूर, कोयंबटूर, त्रिवेंद्रम, भुवनेश्वर, रायपूर, रांची, श्रीनगर, पोर्टब्लेअर, पटना, कोचीन, विजयवाडा, अहमदाबादजम्मू, कारगिल, लडाख, चंदीगड, गोवा, भोपाळ आणि पुणे येथील विमानतळांशी जोडतात. ईशान्य प्रदेश, बेट प्रदेश आणि डोंगराळ राज्य यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एअर इंडिया आणि आयएएफने प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य आणि इतर बेट प्रांतासाठी सहकार्य केले.

देशांतर्गत मालवाहतूक विमान कंपन्या स्पाईसजेट, ब्लू डार्ट आणि इंडिगो व्यावसायिक आधारावर मालवाहू उड्डाणे चालवित आहेत.

24 मार्च ते 17 एप्रिल 2020 या कालावधीत स्पाइसजेटने 393 मालवाहू विमानांचे उड्डाण करून 5,64,691 किमी हवाई अंतर कापून 3183 टन मालवाहतूक केली. यापैकी 126 आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणे होती. ब्लू डार्टने 25 मार्च ते 17 एप्रिल २०२० दरम्यान 134 देशांतर्गत मालवाहू विमानांचे उड्डाण करताना 1,32,295 किमी अंतर पार करीत 2122 टन मालवाहतूक केली. इंडिगोने 3-17 एप्रिल 2020 दरम्यान 29 मालवाहू विमाने चालवून 26,698 किलोमीटर अंतर कापून सुमारे 31टन मालाची वाहतूक केली. यात शासनासाठी केलेला विनाशुल्क वैद्यकीय पुरवठा देखील सामील आहे.

आंतरराष्ट्रीय क्षेत्र- फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे आणि कोविड -19 मदत साहित्याच्या वाहतुकीसाठी 4 एप्रिल 2020 पासून एक हवाई पूल स्थापित करण्यात आला आहे. या विमानांनी आणलेल्या वैद्यकीय साहित्याची तारीखवार नोंद खालीलप्रमाणे:-

S No

Date

From

Quantity (Tons)

1

04.4.2020

Shanghai

21

2

07.4.2020

Hong Kong

06

3

09.4.2020

Shanghai

22

4

10.4.2020

Shanghai

18

5

11.4.2020

Shanghai

18

6

12.4.2020

Shanghai

24

7

14.4.2020

Hong Kong

11

8

14.4.2020

Shanghai

22

9

16.4.2020

Shanghai

22

10

16.4.2020

Hong Kong

17

11

16.4.2020

Seoul

05

12

17.4.2020

Shanghai

21

   

Total

207

 

कृषी उडान कार्यक्रमांतर्गत एअर इंडियाने 15 एप्रिल 2020 रोजी मुंबई आणि फ्रॅंकफर्ट दरम्यान दुसऱ्यांदा उड्डाण केले आणि 27 टन हंगामी फळे आणि भाज्या फ्रॅंकफर्टला पोहोचविल्या आणि परत येताना 10 टन सर्वसाधारण माल आणला. कृषी उडान कार्यक्रमांतर्गत एअर इंडियाने पहिल्यांदा 13 एप्रिल रोजी मुंबई आणि लंडन दरम्यान उड्डाण केले होते. तेव्हा 28.95 टन फळे आणि भाज्या लंडनला नेल्या होत्या आणि परत येताना 15.6 टन सर्वसामान्य माल आणला होता. आवश्यकतेनुसार एर इंडिया गंभीर वैद्यकीय पुरवठ्यांच्या हस्तांतरणासाठी इतर देशांमध्ये समर्पित नियोजित मालवाहू उड्डाणे करणार आहे. एअर इंडियाने 15 एप्रिल 2020 रोजी दिल्ली-सेशेल्स-मॉरिशस-दिल्ली दरम्यान अशाप्रकारचे प्रथम उड्डाण केले. सेशेल्सला 4.4 टन आणि मॉरीशसला 12.6 टन वैद्यकीय साहित्य आणि सामुग्रीचा पुरवठा करण्यात आला.

 

U.Ujgare/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1615726) Visitor Counter : 194


Link mygov.in