पंतप्रधान कार्यालय
आशिया करंडक 2025 च्या विजेत्या पुरुष संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
08 SEP 2025 11:20AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील राजगिर इथे पार पडलेल्या आशिया करंडक 2025 स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. “गतविजेत्या दक्षिण कोरियाच्या संघाला पराभूत करत मिळविलेला हा विजय खूपच खास आहे”, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान आपल्या एक्स माध्यमावरील संदेशात म्हणतात,
“बिहारमध्ये राजगिर इथे झालेल्या आशिया करंडक 2025 मध्ये झळाळते यश मिळवणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. हा विजय खूपच खास आहे कारण गतविजेत्या दक्षिण कोरियाच्या संघाला पराभूत करुन त्यांनी विजेतेपद मिळविले आहे!
भारतीय हॉकी व भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद आहे. आपल्या खेळाडूंनी यशाची नवनवी शिखरे पार करुन देशाला अधिकाधिक गौरवाचे क्षण प्राप्त करुन द्यावेत अशी सदिच्छा!”
सुषमा काणे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2164599)
आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam