पंतप्रधान कार्यालय
लसीकरण करून घेतल्याबाबद्दल 15-18 वयोगटातील किशोरांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2022 11:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लसीकरण केलेल्या 15 ते 18 वयोगटातील युवा भारतीयांचे अभिनंदन केले आहे. या वयोगटातील व्यक्तींना लस मिळण्यास आजपासून सुरुवात झाली. त्यांच्या पालकांचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केले .
पंतप्रधानांनी ट्विट केले:
आपल्या युवा वर्गाचे कोविड-19 पासून संरक्षण करण्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.लसीकरण करून घेतलेल्या 15-18 वयोगटातील माझ्या सर्व तरुण मित्रांचे अभिनंदन. त्यांच्या पालकांचेही अभिनंदन.येत्या काही दिवसांत अधिकाधिक तरुणांनी लसीकरण करून घेण्याचे मी आवाहन करेन !"
या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांचे ट्विटही पंतप्रधानांनी रिट्विट केले.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1789637)
आगंतुक पटल : 733
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
English
,
Bengali
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam