PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
13 JAN 2021 10:27PM by PIB Mumbai
दिल्ली- मुंबई, 13 जानेवारी 2021
आंतरराष्ट्रीय स्तरावरील चिंतेच्या बाबतीत भारताला सहकार्य करणं असो किंवा गुंतवणूकीच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार करणं असो, अनिवासी भारतीय नेहमीच भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे. 9 जानेवारी, 2021 रोजी 16 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या समारोप सत्रा दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते संबोधित करत होते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील कोविड – 19 ची सद्यस्थितीबरोबरच कोविड लसीकरणाबाबत राज्य/केंद्रशासित प्रदेशातील तयारीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी 2021 रोजी कोविड -19 लसीकरणाची स्थिती व तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री व प्रशासक यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठक झाली.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या आज 2.14 लाख (2,14,507) पर्यंत कमी झाली आहे. भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 2.04% एवढी घटली आहे, हा गेल्या 197 दिवसांनंतरचा सर्वात कमी आकडा आहे. 30 जून 2020 ला एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या 2,15,125 एवढी होती.
गेल्या 24 तासात एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या 2051 केसेसनी घटल्याचे नोंदवले गेले.
भारतात नोंदवल्या जाणाऱ्या दैंनदिन रुग्णसंख्येत दररोज सातत्याने घट होत आहे. गेल्या 24 तासात राष्ट्रीय पातळीवर 16,000 हून कमी (15,968) रुग्णसंख्या नोंदवली गेली, तर 17,817 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली. उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची जास्त संख्या ही उपचाराधीन रुग्णसंख्येतील सातत्यपूर्ण घट दर्शवते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
इतर अपडेट्स:
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांशी तसेच प्रधान सचिवांशी/ अतिरिक्त मुख्य सचिवांशी संवाद साधला. 8 जानेवारी रोजी झालेल्या देशव्यापी 'कोविड लसीकरण रंगीत तालमीच्या' तयारीचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
- कोविड-19 महामारीमुळे मोठा फटका सोसावा लागलेल्या गरीब आणि वंचित वर्गाला सामाजिक सहाय्य पुरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी, प्रोग्राम लोनकरिता जपान सरकार 30 अब्ज जपानी येन (सुमारे 2,113 कोटी रुपये) अधिकृत विकास सहाय्य कर्ज पुरवणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
- राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि सर्व हितधारकांच्या सहकार्याने केंद्र सरकारने कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी सज्ज होण्यासंदर्भात देशभरात कार्यवाही सुरू केली आहे. केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू) राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरण व्यवस्थापनाचा कणा असलेल्या कोविन सॉफ्टवेअर संदर्भात चर्चा केली.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
- रेल्वे मंत्रालयाने प्रवासाच्या 21.03.2020 ते 31.07.2020 या कालावधीसाठी आरक्षित केलेली पीआरएस काउंटर तिकिटे रद्द करण्यासाठी व आरक्षण खिडकीवरून त्याचा परतावा मिळवण्यासाठी घातलेली कालमर्यादा प्रवासाच्या दिवसांपासून सहा महिने होती ती आता वाढवून नऊ महिन्यांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. जर आरक्षित तिकीट 139 मधून वा आयआरसीटीसी संकेतस्थळावरून रद्द केले गेले असेल तर असे तिकीट प्रवासाच्या दिनांकापासून नऊ महिन्यात आरक्षण खिडकीवर परत करता येईल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
- केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ईशान्य प्रदेश विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन, अणूऊर्जा, आणि अंतरीक्ष राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की कोरोनाने आपल्याला आपल्या मूळ भारतीय संस्कृतीच्या गुणवैशिष्ट्यांकडे परत येण्यास सक्षम केले आणि हात धुणे, नमस्ते यासारख्या पध्दती पुन्हा प्रचलित झाल्या असून जोमाने सुरू झाल्या आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र अपडेट्स
महाराष्ट्राला कोविशिल्ड लसीचे 9.63 लाख डोजेस मिळाले आहेत. कोविशील्ड लसींची पहिली खेप आज मुंबईत पोहोचली.एकूण 1,39,500 डोजेस मिळाले आहेत.या लसींचा साठा, परळच्या एफ/दक्षिण वार्ड विभागातल्या साठवणूक केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आला असून येत्या 16 जानेवारीला लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यासाठी या लसी मुंबईतल्या विविध लसीकारण केंद्रांवर पोहोचवल्या जाणार आहेत.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून लसीकरणासाठीची सर्व व्यवस्थाही करण्यात आली आहे. सात लाख 84 हजार पेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांची कोविन पोर्टलवर नोंदणी झाली असून काल मध्यरात्रीपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल अशी माहिती टोपे यांनी दिली. लसीकरण मोहीम 511 केंद्रांवर पुढचे तीन महिने सुरु राहणार आहे.
या प्रत्येक केंद्रावर किमान 100 जणांना लस दिली जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी दिली.राज्यातली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा आणि शासकीयरुग्णालयांमध्येही लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मुंबईत सर्वाधिक म्हणजे 72 लसीकरण केंद्रे आहेत तर त्या खालोखाल पुण्यात 55, ठाण्यात 42, नाशिकमध्ये 23 आणि अहमदनगर जिल्ह्यात 21 केंद्रे आहेत.आतापर्यंत महाराष्ट्रातील 17,749 लोकांनी लसीकरणासाठी कोविन ॲपवरनोंदणी केली आहे.
महाराष्ट्रात मंगळवारी कोविडच्या 2,936 नव्या रुग्णांची नोंद झाली असून त्यामुळे राज्यातल्या एकूण रुगांची संख्या 19,74,488 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 3,282 रुग्णांना बरे झाल्यावर घरी पाठवण्यात आले असून त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 18,71,270 इतकी झाली आहे. मंगळवारी 50 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला असून त्यामुळे एकूण बळींचा आकडा 50,151 इतका झाला आहे. राज्यात सध्या कोविडचे सक्रीय रुग्ण 51,892 आहेत. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.77 टक्के आहेत. तर मृत्यूदर 2.54 इतका आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1.35 कोटी इतक्या चाचण्या झाल्या आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याचे प्रमाण 14.63 टक्के आहे.
मुंबईत कोविडचे 473 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 2,99,799 इतकी झाली आहे. मुंबईत दिवसभरात 441 जण बरे झाले तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.
Jaydevi P.S/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688416)
Visitor Counter : 297