आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सक्रीय रुग्णसंख्येतील घट कायम, भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या 197 दिवसांनी 2.14 लाखांपर्यंत कमी झाली


गेल्या चोवीस तासांत, दैनिक नवीन रुग्णसंख्या 15,968

Posted On: 13 JAN 2021 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या आज 2.14 lakh (2,14,507) पर्यंत कमी झाली आहे. भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 2.04% एवढी घटली आहे, हा गेल्या 197 दिवसांनंतरचा सर्वात कमी आकडा आहे. 30 जून 2020 ला एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या 2,15,125 एवढी होती.

गेल्या 24 तासात एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या 2051 केसेसनी घटल्याचे नोंदवले गेले.

भारतात नोंदवल्या जाणाऱ्या दैंनदिन रुग्णसंख्येत दररोज सातत्याने घट होत आहे. गेल्या 24 तासात राष्ट्रीय पातळीवर 16,000 हून कमी (15,968)  रुग्णसंख्या नोंदवली गेली, तर 17,817  रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली. उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची जास्त संख्या ही उपचाराधीन रुग्णसंख्येतील सातत्यपूर्ण घट दर्शवते.

बरे झालेल्यांची एकूण संख्या 10,129,111 असून रिकवरी रेट 95.51%.  आहे. बरे झालेल्यांच्या आणि उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतील फरक सातत्याने वाढत असून तो सध्या 99,14,604 पर्यंत पोचला आहे.

गेल्या 24 तासात बरे झालेल्यांच्या एकूण संख्येपैकी  81.83%  संख्या ही दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील आहे.

केरळमध्ये 4,270  जण बरे झाले व दैनिक रोगमुक्तांची संख्या सर्वाधिक आहे,  त्यानंतर महाराष्ट्रात 3,282 नवीन रोगमुक्तांची संख्या तर छत्तीसगढ़मध्ये 1,207 ही दैनंदिन रोगमुक्तांची संख्या आहे.

नवीन रुग्णसंख्येपैकी 74.82% ही सात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील आहे.

केरळमध्ये  सर्वाधिक म्हणजे 5,507 दैनिक नव्या केसेस गेल्या 24 तासात नोंदवल्या गेल्या. महाराष्ट्रात 2,936 नव्या केसेस तर कर्नाटकात 751 नव्या केसेस काल नोंदवल्या गेल्या.

गेल्या 24 तासांत  नव्याने 202  जणांचे कोविड-19 ने मृत्यू झाले त्यापैकी 70.30%  हे सात राज्य़े/ केंद्रशासित प्रदेशातील होते. महाराष्ट्रात 50 मृत्यू नोंदवले गेले. त्यापाठोपाठ केरळ व पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे  25 व 18 मृत्यू झाले.

कोविड-19 लसीकरण 16 जानेवारी 2021 पासून वेगाने सुरु होणार आहे. लोकांचा सहभाग (जन बिरादरी) या तत्वावर आधारीत एक मोठी देशव्यापी मोहीम योजण्यात आली आहे. निवडणूकीचा अनुभव (मतदान केंद्र धोरण) व जागतीक लसीकरण मोहिम (UIP), वापरून, सध्याच्या आरोग्यव्यवस्थेशी तडजोडी न करता, प्रामुख्याने राष्ट्रीय पातळीवरील मोहिम व प्राथमिक आरोग्य केंद्रे, विज्ञान व नियमनाच्या अटींवर ठाम रहात तंत्रज्ञानाच्या मदतीने शिस्तबद्ध व सुरळीत लसीकरण मोहिम आखण्यात आली आहे. 

कोविड-19 लसीसाठी प्रथम आरोग्यसेवक व आघाडीवरील कामे करणारे यांची संख्या तीन कोटींपर्यंत जाईल, त्यानंतर कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 50 वर्षे वयावरच्यांना ज्यांची संख्या सुमारे 27 कोटी आहे, अशांना लस दिली जाईल.

तंत्रज्ञानाच्या चौकटीत या सर्वांचा व्यवस्थित विचार करून लसीकरण मोहीम सहज राबवली जाउ शकेल.

युके मध्ये सापडलेल्या नवीन विषाणूंच्या बाधितांची संख्या आता 102 झाली आहे.

 

U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1688248) Visitor Counter : 318