राष्ट्रपती कार्यालय

प्रवासी भारतीय जगासमोर असलेला आपला चेहरा आहेत आणि जागतिक व्यासपीठावर भारताच्या हिताचे पुरस्कर्ते आहेत - राष्ट्रपती

Posted On: 09 JAN 2021 8:41PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील चिंतेच्या बाबतीत भारताला सहकार्य करणं असो किंवा गुंतवणूकीच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार करणं असो, अनिवासी भारतीय नेहमीच भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे. आज (9 जानेवारी, 2021) 16 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या समारोप सत्रा दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते संबोधित करत होते.

1915 साली याच दिवशी महान प्रवासी भारतीय, महात्मा गांधी भारतात परतले. आपल्या सामाजिक सुधारणांना आणि स्वातंत्र्य चळवळीला त्यांनी व्यापक आधार दिला आणि पुढच्या तीन दशकांत त्यांनी अनेक मूलभूत मार्गांनी भारताला बदलले, असे राष्ट्रपती म्हणाले..

त्याआधी, आपल्या दोन दशकांच्या परदेश वास्तव्याच्या वेळी, बापूंनी भारताने आपल्या विकासासाठी जो दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे त्यासाठीची मूलभूत तत्त्वे अधोरेखित केली.

वैयक्तिक आणि सामूहिक जीवनासाठी गांधीजींचे आदर्श स्मरण करण्याचा दिवस म्हणूनही प्रवासी भारतीय दिवस ओळखला जातो असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

अनिवासी भारतीयांशी असलेले संबंध नव्याने दृढ करण्याच्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या दृष्टिकोनाबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत असेही राष्ट्रपती म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 2003 मध्ये प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

भारतीय समुदायाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले, तुम्ही भारताच्या सॉफ्ट पॉवरचा प्रसार केला आणि जागतिक व्यासपीठावर आपली ओळख निर्माण केली. भारताबद्दलचे भावनिक नाते, संस्कृती आणि परंपरा तुम्ही जपत आल्याबद्दल आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे. तुम्ही राहत असलेल्या देशांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी हातभार लावत आहात आणि त्याच वेळी भारतीयत्वाची भावना कायम आपल्या मनात ठेवत आहात. या भावनिक बंध भारतासाठी लाभदायक ठरला आहे. जागतिक स्तरावर तुम्ही भारताचा विस्तार वाढवला आहे", असे राष्ट्रपती म्हणाले

कोविड महामारीबद्दल बोलताना राष्ट्रपती म्हणाले की कोविड -19 मुळे 2020 हे वर्ष जागतिक संकटाचे वर्ष राहिले. या साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या प्रचंड आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करण्यात भारत आघाडीवर आहे.

 

S.Mhatre/S.Tupe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687369) Visitor Counter : 259