अर्थ मंत्रालय
सामाजिक सुरक्षेकरिता कोविड-19 संकट प्रतिसाद सहाय्य कर्जासाठी जपानचे विकास सहाय्य
Posted On:
08 JAN 2021 7:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2021
कोविड-19 महामारीमुळे मोठा फटका सोसावा लागलेल्या गरीब आणि वंचित वर्गाला सामाजिक सहाय्य पुरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी, प्रोग्राम लोनकरिता जपान सरकार 30 अब्ज जपानी येन (सुमारे 2,113 कोटी रुपये) अधिकृत विकास सहाय्य कर्ज पुरवणार आहे.
केंद्र सरकारच्या आर्थिक विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ सी एस मोहपात्रा आणि जपानच्या भारतातल्या दूतावासातले राजदूत सुझुकी सातोशी यांनी या संदर्भातल्या दस्तावेजावर स्वाक्षऱ्या केल्या. या दस्तावेजाचे आदान-प्रदान केल्यानंतर या प्रोग्राम लोनकरिता कर्ज विषयक करारावर डॉ मोहपात्रा आणि कत्सूओ मत्सूमोटो, प्रमुख प्रतिनिधी, जेआयसीए, नवी दिल्ली यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
कोविड-19 महामारीमुळे मोठा फटका सोसावा लागलेल्या गरीब आणि वंचित वर्गाला समन्वित आणि पुरेसे सामाजिक सहाय्य पुरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना सहाय्य करण्याचा यामागचा उद्देश आहे.
भारत आणि जपान यांच्यात द्विपक्षीय विकास सहकार्याचा 1958 पासून प्रदीर्घ आणि फलदायी इतिहास आहे. गेल्या काही वर्षात भारत आणि जपान यांच्यातले आर्थिक सहकार्य अधिक दृढ झाले असून धोरणात्मक भागीदारीच्या रूपाने वृद्धिंगत झाले आहे. यामुळे भारत आणि जपान यांच्यातली धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक बळकट झाली आहे.
* * *
S.Tupe/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687161)
Visitor Counter : 250