कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कोरोनाने भारताला आपल्या मूळ संस्कृतीच्या गुणवैशिष्ट्यांकडे आणले, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
"सुशासनाचे अंतिम लक्ष्य सामान्य माणसाचे जीवन सुखकर करणे" : डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
09 JAN 2021 6:29PM by PIB Mumbai
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ईशान्य प्रदेश विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन, अणूऊर्जा, आणि अंतरीक्ष राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आज म्हणाले की कोरोनाने आपल्याला आपल्या मूळ भारतीय संस्कृतीच्या गुणवैशिष्ट्यांकडे परत येण्यास सक्षम केले आणि हात धुणे, नमस्ते यासारख्या पध्दती पुन्हा प्रचलित झाल्या असून जोमाने सुरू झाल्या आहेत. आरोग्याची काळजी घेणे याला आता राष्ट्रीय प्राधान्य देणे गरजेचे आहे याबाबत कोविडने आपल्याला जागरूक केले आहे आणि शारीरिक अंतर, स्वच्छता, योगा, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधे इत्यादी गुणांची जगाला ओळख करून दिली. आता या सगळ्या गोष्टींवर त्यांचा पुन्हा पूर्वीपेक्षा अधिक विश्वास बसला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिलेल्या योग आयुर्वेद यासारख्या क्षेत्रांबद्दल त्यांची नव्याने उत्सुकता वाढली आहे. ते भारतीय लोक प्रशासन संस्था (आयआयपीए) येथे 'कल्याणासाठी आंतरिक अभियांत्रिकी-तंत्रज्ञान’ या विषयावर सद्गुरुंसह सत्राला संबोधित करीत होते.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपले निरीक्षण नोंदवले, की विशेषतः टाळेबंदीच्या कालावधीत अनेक लोक आपल्या प्रतिकारशक्तीत सुधारणा करण्यासाठी केवळ योगकडे वळले असे नसून एकटेपणा आणि चिंता यांच्या वेदनेतून मुक्त होण्यासाठी देखील त्यांनी योगाभ्यास केला. ते म्हणाले, की कोविडनंतरच्या युगाचा एक परिणाम म्हणजे कोरोना विषाणू गेल्यावरही ज्यांना टाळेबंदीच्या काळात योगची सवय लागली आहे ते शक्यतो पुढील आयुष्यातही हा अभ्यास सुरू ठेवतील ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात हा आशिर्वाद कायमस्वरूपी राहील.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, की सुशासनाचे अंतिम उद्दिष्ट सामान्य नागरीकांचे जीवनमान सुलभ करणे हे आहे आणि त्यांनी, सदगुरूंनी म्हटल्याप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आनंदी आणि सुखी प्रशासक सर्वत्र आनंद पसरवू शकतात, याचे जोरदार समर्थन केले
सद्गुरु आपल्या भाषणात म्हणाले की भारत हा कोणतीही साचेबंद आस्था चौकट नसलेल्या साधकांचा देश आहे. त्यांनी दुसऱ्यांची संस्कृती काबीज करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही पण ही भूमी चौकस (माणसांची) होती आणि आपल्या प्रजासत्ताकाच्या प्रगतीसाठी आपण ही परंपरा कायम राखायला हवी.
सदगुरु म्हणाले, की कोरोना विषाणू जबाबदारीने वागण्याची मागणी करतो आणि ही शिकवण सर्वसामान्यांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी पुढारी आणि प्रशासक यांना उपयुक्त आहे .
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एन.भंडारी, आयआयपीएचे उपाध्यक्ष शेखरदत्त, आयआयपीएचे संचालक श्री. एस.एन. त्रिपाठी, सुरभी पांडे, अमिताभ रंजन, नवलजीत कपूरंद,आणि इतर वरीष्ठ अधिकारी तसेच आयआयपीएचा शिक्षकवर्ग हे या समारंभाला उपस्थित होते.
S.Mhatre/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687324)
Visitor Counter : 276