PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 04 DEC 2020 8:15PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 4 डिसेंबर 2020

Coat of arms of India PNG images free download  

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

Image

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड-19 लसीकरण धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठक घेतली. सरकार व्यापक लसीकरण धोरण विकसित करत आहे. सुरक्षित आणि परवडणारी लस विकसित करण्याच्या दृष्टीने जग भारताकडे पाहत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

देशात उपचार सुरु असलेल्या कोविड रुग्णांचे प्रमाण कालच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 4.44 टक्क्यांवरून आज 4.35 टक्क्यांपर्यंत खाली घसरले.

मागील 7 दिवसांचा कल कायम ठेवत भारतात गेल्या  24 तासात नवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या अधिक नोंदवली गेली.

नवीन सक्रिय रूग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक असल्याचा कल कायम राहिल्यामुळे देशातील उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या एकूण संख्येत सातत्याने घट होत असून आज ही संख्या 4,16,082 इतकी आहे.

गेल्या 24 तासांमध्ये देशात 36,595 नवे रुग्ण आढळले तर 42,916 रुग्ण बरे झाले. गेल्या 24 तासांत बरे झालेले रुग्ण आणि नवीन बाधित रुग्ण यांच्यातील फरक 6,321 इतका असून यामुळे एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत 6,861 ने घट झाली आहे.

जगातील प्रति दहालाख लोकसंख्येमागे सर्वात कमी म्हणजेच (6,936) रुग्णसंख्या भारताने नोंदवली असून पश्चिम गोलार्धातील इतर देशांपेक्षा हे प्रमाण खूपच कमी आहे.

बरे झालेल्या रुग्णांचा दर आज 94.2% वर पोहचला आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 90,16,289 इतकी आहे. बरे झालेले रुग्ण आणि नवीन बाधित रुग्ण यांच्यातील दरी निरंतर वाढत आहे आणि सध्या ते 86,00,207 इतके आहे.

बरे झालेल्या रुग्णांपैकी 80.19 टक्के रुग्ण दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

महाराष्ट्रात काल सर्वाधिक 8,066 रुग्ण कोविड मुक्त झाले असून केरळमध्ये 5,590 रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत 4,834 रुग्ण बरे झाले.

गेल्या 24 तासांमध्ये देशात आढळलेल्या नवीन रुग्णांपैकी  75.76 टक्के रुग्ण  दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये केरळमध्ये 5,376 नव्या रुग्णांची नोंद झाली, त्याखालोखाल महाराष्ट्रात 5,182 तर  दिल्लीमध्ये 3,734 नवीन रूग्ण आढळले.

गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19 या महामारीमुळे 540 जणांचा मृत्यू झाला. यापैकी  77.78  टक्के मृत्यू दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाल्याची नोंद आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 115 मृत्यूची नोंद झाली असून  हे प्रमाण 21.29 टक्के आहे. दिल्लीमध्ये 82 तर पश्चिम बंगालमध्ये 49 जणांचा मृत्यू झाला.

जागतिक स्तरावर तुलना केली तर भारत प्रति दशलक्ष लोकसंख्येमध्ये (101) इतक्या सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण असलेल्या देशांपैकी एक आहे.

 

इतर अपडेट्स:

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळा (सीबीआयसी) अंतर्गत कार्यरत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), 63 व्या स्थापना दिन सोहळ्याचे उद्घाटन केले. कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, यावर्षी डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले ज्यामध्ये 450 हून अधिक डीआरआय, सीबीआयसी आणि जगभरातील भारत सरकारचे अधिकारी सहभागी झाले होते.

 

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी चर्चेसाठी आमंत्रित केलेल्या चाळीस शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी केंद्रीय कृषिमंत्री मंत्री नरेंद्र सिंह तोमर, अन्न, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण, रेल्वे व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्यासमवेत विज्ञान भवन येथे  झालेल्या चर्चेत सहभागी झाले.  या चर्चेत  कृषी मंत्रालय आणि अन्न ग्राहक व्यवहार मंत्रालय व सार्वजनिक वितरण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले. सौहार्दपूर्ण आणि खुल्या वातावरणात पार पडलेली चर्चेची ही चौथी फेरी होती.

पुणे येथील कमांड हॉस्पिटल (दक्षिण कमांड) च्या ईएनटी विभागाने कमांडट मेजर जनरल एस हसनैन  यांच्या अधिपत्याखाली 04-06 डिसेंबर 2020, या कालावधीत ओटोफ्रॉन्ट-2020 ही राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. लेफ्टनंट जनरल ए के हूडा, पीएचएस, महासंचालक  मेडिकल सर्व्हिस (आर्मी) आणि कर्नल कमांडंट आर्मी मेडिकल कॉर्प्स यांनी डिजिटल माध्यमातून 04 डिसेम्बर 2020 रोजी  या परिषदेचे उदघाटन केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज आभासी पद्धतीने नागालँडमध्ये 15 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली. या प्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की केंद्र सरकार ईशान्य व नागालँडच्या विकासासाठी वचनबद्ध असून नागालँडमधील राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यामध्ये 6 वर्षात 667 कि.मी. जोडले  असून त्यात जवळपास 76 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

विशिष्ट तांत्रिक उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने  समर्पित ईपीसी मंडळाची स्थापना करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने 1 डिसेंबर 2020 ला प्रसिद्ध केलेल्या सरकारी नोटीसीद्वारे प्रस्ताव मागविले आहेत. कंपनी कायदा किंवा सहकारी संस्था नोंदणी कायद्याखाली निर्यातदार संघटना आणि व्यापारी संस्था यांनी टेक्नीकल टेक्सटाईल्स अर्थात परिधान करायच्या आणि दैनंदिन वापराच्या कपड्यांखेरीज इतर विशिष्ट कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांच्या निर्यातीसाठी समर्पित ईपीसी अर्थात निर्यात प्रोत्साहन मंडळाची स्थापना करण्यासाठीचे प्रस्ताव 15 डिसेंबरपर्यंत वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे सादर करायचे आहे.

 

महाराष्ट्र अपडेट्स:

बृहन्मुंबई महानगरपालिका लस मंजूर होताच एका महिन्यात सुमारे 1 कोटी लोकांचे लसीकरण करण्यासाठी तयारी करत आहे. यासाठी, महानगरपालिकेने लसीकरणाच्या प्रक्रियेची ब्लू प्रिंट तयार केली आहे आणि ते प्रथम मुंबईकरांसाठी लसीकरणाची योजना आखत आहेत. तसेच वैद्यकीय कर्मचारी, घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी, पोलीस दल आणि 50 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाच्या प्राधान्य यादीमध्ये समाविष्ट करण्याची महानगरपालिकेची योजना आहे.

 

FACT CHECK

 

 

 

 

Image

 

Image

***

S.Thakur/S.Tupe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678420) Visitor Counter : 182