अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते डीआरआयच्या 63 व्या स्थापना दिन सोहळ्याचे  उद्घाटन

Posted On: 04 DEC 2020 7:12PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळा (सीबीआयसी) अंतर्गत कार्यरत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), 63 व्या स्थापना दिन सोहळ्याचे उद्घाटन केले.

कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, यावर्षी डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले ज्यामध्ये 450 हून अधिक डीआरआय, सीबीआयसी आणि जगभरातील भारत सरकारचे अधिकारी सहभागी झाले होते.

सीतारमण यांनी स्मगलिंग इन इंडिया रिपोर्ट 2019-20” चे अनावरण केले ज्यामध्ये सोने व परकीय चलन, मादक द्रव्ये, सुरक्षा, पर्यावरण, वाणिज्यिक फसवणूक या विषयांवरील संघटित तस्करीचे विश्लेषण केले आहे.  डीजीआरआयचे पीआर, बालेश कुमार यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि मागील आर्थिक वर्षाच्या डीआरआयच्या कामगिरीचा अहवाल सादर केला.

अर्थमंत्र्यांनी डीआरआय आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे त्यांच्या कामगिरीबद्दल आणि विशेषतः साथीच्या काळात त्यांनी केलेल्या कौतुकास्पद सेवेबद्दल त्याचे अभिनंदन केले. जोखीम असताना देखील अधिकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी अर्थमंत्र्यांनी डीआरआयच्या 800 अधिकाऱ्यांचे कौतुक केले. अर्थमंत्र्यांनी डीआरआयच्या अधिकाऱ्यांना निरंतर कठोर परिश्रम करण्याचे प्रोत्साहन दिले कारण डीआरआयने दाखल केलेले खटले आणि अटक हे मोठ्या प्रमाणात असले तरीदेखील ते केवळ हिमनगाचे एक टोक आहे. सीतारमण यांनी  डीआरआय आणि भारतीय सीमाशुल्क विभाग यांना विनंती केली की भारताच्या आर्थिक सीमेवरील प्रत्येक गुन्हेगारावर कारवाई केली जावी.

सीतारमण यांनी जगभरातील सीमाशुल्क अंमलबजावणी करणार्‍या संस्थांमध्ये कृतीशील माहितीची देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या भूमिकेचा स्वीकार केला आणि परस्पर फायद्यासाठी अशा गुप्तवार्तांचे आदानप्रदान करण्याच्या गरजेवर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाला जागतिक सीमाशुल्क संघटनेचे सरचिटणीस डॉ. कुनिओ मिकुरिया उपस्थित होते आणि त्यांनी कोविड-19 साथीच्या आजाराला सीमाशुल्क विभागाचा प्रतिसादया विषयावर उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी डीआरआय कोचीन झोनल युनिटचे  नजीमुद्दीन टी एस आणि जयपूरच्या डीआरआयने दाखल केलेल्या खटल्याचा स्वतंत्र साक्षीदार  सुमेर सेन यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतीय महसूल सेवे (सीमा शुल्क व मध्यवर्ती उत्पादन शुल्क) च्या 1961 च्या तुकडीचे अधिकारी बी. शंकरन यांना त्यांच्या वर्षांच्या सन्माननीय आणि वचनबद्ध सेवेसाठी डीआरआय उत्कृष्ठसेवा सम्मान, 2020 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रवास करण्यास असलेल्या निर्बंधांमुळे  यावर्षी अर्थमंत्र्यांच्या वतीने आज सकाळी डीआरआयच्या विभागीय विभागाच्या प्रधान अतिरिक्त महासंचालकांनी  शौर्य पुरस्कार व उत्कर्ष सेवा सन्मान प्रदान केले. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर या समारंभांची व्हिडिओ रेकॉर्डिंग्ज दाखवण्यात आले.

****

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678388) Visitor Counter : 188