रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागालँडमधील महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन आणि सुमारे 266 किलोमीटर लांबीच्या आणि सुमारे 4127 कोटी रुपयांच्या 14 महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी

नागालँडमधील राष्ट्रीय महामार्गांचा विकास आणि सुधारणेसाठी मागील 6 वर्षात 1063.41 किलोमीटर लांबीच्या आणि एकूण 11,711 कोटी रुपयांच्या 55 कामांना मंजुरी : गडकरी

Posted On: 04 DEC 2020 6:13PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज आभासी पद्धतीने नागालँडमध्ये 15 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री नेफी रिओ, एमओएस-आरटीएच जनरल (डॉ) व्ही के. सिंह, खासदार, आमदार, केंद्र व राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. * या एनएच प्रकल्पांची लांबी सुमारे 266 किलोमीटर असून सुमारे 4127 कोटी रुपये खर्च होणार आहेत. *

या प्रसंगी बोलताना श्री गडकरी म्हणाले की केंद्र सरकार ईशान्य व नागालँडच्या विकासासाठी वचनबद्ध असून नागालँडमधील राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यामध्ये 6 वर्षात 667 कि.मी. जोडले  असून त्यात जवळपास 76 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. 2014 पर्यंत राज्यातील एनएच नेटवर्कचा विस्तार 880.68 किमीवरून 1547 किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आले आहे. मंत्री म्हणाले, नागालँडमधील बहुतेक सर्व जिल्हे आता राष्ट्रीय महामार्गाच्या मजबूत नेटवर्कशी जोडले आहेत.

श्री गडकरी यांनी सांगितले की राष्ट्रीय महामार्गाच्या विकास व सुधारण्यासाठी मागील 6 वर्षात एकूण 1063.41 कि.मी. लांबीच्या आणि एकूण 11,711 कोटी रुपये किंमतीच्या  55 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये दिमापूर शहराच्या (नागालँडचे सर्वात मोठे शहर) 3 सुधारणा प्रकल्पातील  सुमारे 48 कि.मी. लांबीच्या काँक्रीट रस्त्यांचा समावेश असून यासाठी एकूण 1598 कोटी रुपये खर्च झाला आहे. ते म्हणाले की 7955 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या 690 कि.मी. लांबीचे  प्रगतीपथावर आहे. 966.75 कोटी रुपयांच्या 105 कि.मी.ची आणखी सात कामे निविदा अवस्थेत आहेत. 2020-21 दरम्यान 178 किमी लांबीच्या 2,127 कोटी रुपयांच्या 11 कामांना वाढीव मंजुरी देण्यात आली आहे. 6,000 कोटी रुपये किंमतीची 524 कि.मी.ची पाच कामे डीपीआर टप्प्यात आहेत.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, सीआरएफ अंतर्गत 2002 पासून आतापर्यंत एकूण  1,334.3 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी 487.14 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. नागालँडसाठी लवकरच 45 कोटी रुपयांची रक्कम जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्याचे बीओएस गुणोत्तर आज 11.5% आहे, जे खूपच जास्त आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोहिमा बायपास संदर्भात जमीन व नुकसान भरपाईचा अंदाज तातडीने पाठवावा अशी विनंती केली.  एनएचआयडीसीएलने नागालँडमधील कोहिमा-माओ रस्त्याचे दुहेरीकरणाचे काम हाती घेतले असून या कामाला 30 सप्टेंबर 2020 रोजी नागरी कार्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. नियुक्त तारीख 20 ऑक्टोबर 2020 जाहीर केली सून आणि कंत्राटदार साइटवर एकत्रित झाले आहेत. नुकसान भरपाईच्या अंदाजाची वाट पाहत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार लवकरच हे काम लवकरात लवकर पूर्ण करेल आणि बांधकाम लवकर सुरू करता येईल.

मुख्यमंत्री नेफि रिओ यांनी गडकरी यांना राज्यातील पायथ्याशी असलेल्या रस्त्यांच्या विकासाचा विचार करण्याची विनंती केली. यासंदर्भात विचारविनिमय सुरु असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. नागालँडची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिमापूर-कोहिमा रस्त्याचा मुद्दाही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. हे काम प्रगतीपथावर असून या रस्त्याचे 70-80 टक्के काम पूर्ण झाले आहे अशी माहिती श्री गडकरी यांनी यावेळी दिली. प्रकल्प सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी आणि कामाची प्रगती वेगवान करण्यासाठी एनएचआयडीसीएलने कठोर प्रयत्न केले आहेत. कामांची गती वाढविण्यासाठी उच्च स्तरावर नियमित बैठक घेण्यात येत आहेत. गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी महामार्गाच्या कामांचा आढावा घेण्याचे आवाहन केले. सुमारे 26.25 किलोमीटर लांबीच्या कोहिमा - मावो रस्त्याची पायाभरणी करताना गडकरी यांनी सांगितले की म्यानमारला जोडणारा हा भाग आशियाई महामार्गाचा (एएच-1) महत्वाचा भाग आहे कारण यामुळे कोहिमा शहर मणिपूर सीमेला जोडले जाऊन याच्या कनेक्टीव्हिटी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. नागालँडच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीमध्ये देखील याचे स्थान महत्वाचे आहे. बांबू इत्यादी विविध स्त्रोतांमधून उद्योग व व्यापार व स्थानिक उत्पादनांचे मार्केटिंग वृद्धिंगत करण्यात चांगले रस्ते मदत करतील.

एमओएस-आरटीएच जनरल (डॉ) व्ही के सिंह म्हणाले, नागालँड हे एक सुंदर ठिकाण आहे आणि नवीन महामार्ग प्रकल्पांमुळे राज्यात पर्यटकांची संख्या वाढेल अशी आशा आहे. आज ज्या 14 प्रकल्पांची पायाभरणी केली होती त्यापैकी 11 प्रकल्प एनएचआयडीसीएल आणि 3 राज्य पीडब्ल्यूडीमार्फत एमआरटीएचच्या रोड विंगच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

 

YouTube: https://youtu.be/Ig9MAINaInc  

***

M.Iyengar/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1678347) Visitor Counter : 16