संरक्षण मंत्रालय

कमांड हॉस्पिटल पुणे (ईएनटी विभाग ) यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शस्त्रक्रियांबाबत राष्ट्रीय वेबिनारचे केले आहे आयोजन

Posted On: 04 DEC 2020 6:53PM by PIB Mumbai

 

पुणे येथील  कमांड हॉस्पिटलचे (दक्षिण कमांड) च्या ईएनटी विभागाने कमांडट मेजर जनरल एस हसनैन  यांच्या अधिपत्याखाली  04-06 डिसेंबर 2020, या कालावधीत ओटोफ्रॉन्ट-2020 ही  राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. लेफ्टनंट जनरल ए के हूडा, पीएचएस, महासंचालक  मेडिकल सर्व्हिस (आर्मी) आणि कर्नल कमांडंट आर्मी मेडिकल कोअर यांनी डिजिटल माध्यमातून 04 डिसेम्बर 2020.रोजी  या परिषदेचे उदघाटन केले. यावेळी ते म्हणाले की , औषधाचे क्षेत्र अधिकाधिक विशेष होत आहे, डॉकटर  किरकोळ गुंतागुंतीकडे लक्ष केंद्रित करत आहेत . मात्र  रुग्णाची काळजी आणि वैद्यकीय उपचार हे साधारणपणे परस्पर व्याप्त असून त्याकडे लक्ष दिले पाहिजे. हे या कार्यशाळेचे सार आहे. ही कार्यशाळा विविध शस्त्रक्रिया वैशिष्ट्यांमधील इंटरफेस आणि सहकार्याबद्दल आहे.

कार्यशाळेचे आयोजन तीन  दिवसांच्या कालावधीत होईल, ज्यात शल्यक्रिया व्हिडिओ प्रख्यात शल्य चिकित्सकांद्वारे दाखवले जातील. वरिष्ठ शल्य चिकित्सकांच्या ज्ञानाचे एकत्रीकरण आणि तरुणांचा उत्साहयात असेल. ईएनटी आणि न्यूरोसर्जरी, ऑन्कोसर्जरी, रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, मॅक्सिलो-फेशियल शस्त्रक्रिया, जीआय शस्त्रक्रिया आणि ऍनेस्थेशिओलॉजी यासारख्या विविध शल्यक्रिया ज्यात इंटरफेस आवश्यक असतो जेणेकरून  रूग्णांची काळजी घेतली जाईल आणि योग्य उपचारांबाबत चर्चा  केली जाईल. या परिषदेत देशभरातील जवळपास 500 प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

आयोजन समितीचे अध्यक्ष ईएनटी विभाग प्रमुख कर्नल उमा पटनाईक म्हणाल्या  की सध्याच्या कोविड परिस्थितीस अनुरूप अंतराच्या निकष चे पालन करून परिषद पूर्णपणे डिजिटल व्यासपीठावर आखली गेली आहे. बहुतेक परिषदांसाठी शिक्षण अध्यापनहा प्रकार आता नवीन  नॉर्मअसेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

M.Iyengar/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678365) Visitor Counter : 156


Read this release in: English