PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
12 NOV 2020 6:58PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)

#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona


दिल्ली-मुंबई, 12 नोव्हेंबर 2020
17 व्या आसियान-भारत आभासी शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त उद्या- 13 नोव्हेंबर, 2020 रोजी दोन आयुर्वेद संस्था राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यामध्ये गुजरातमधील जामनगर येथील आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था (आयटीआरए) आणि जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्था (एनआयए) यांचा समावेश आहे. देशातल्या या दोन्ही प्रमुख आयुर्वेद संस्था आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोस अदनोम गेब्रीऐसेस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील कटक इथल्या प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरण पीठाचे कार्यालय तसेच निवासी संकुल इमारतीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की या नव्या पीठामुळे केवळ ओदिशातील करदात्यांनाच नाही तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील लक्षावधी करदात्यांचेही या भागात प्रलंबित असलेले अनेक खटले मार्गी लावता येतील.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
देशभरात सलग 5 व्या दिवशी, नवीन रुग्णाची संख्या 50,000 च्या आत राहिली आहे. गेल्या 24 तासात 47,905 नवे बाधित रुग्ण आढळले आहेत.
रुग्ण बरे होण्याची दैनंदिन संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त असण्याचा कल 40 व्या दिवशीही कायम असून गेल्या 24 तासात 52,718 रुग्ण बरे झाले आहेत.
सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 4.98 लाख आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी केवळ 5.63 टक्के रुग्णांवर उपचार सुरु असून ही संख्या 5 लाखांच्या खाली म्हणजेच 4,89,294 इतकी आहे.
नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक असल्याने रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला आहे. सध्या हा दर 92.89 टक्के इतका आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 80,66,501 वर गेली आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यातील अंतर झपाट्याने वाढत असून 75,77,207 झाले आहे.
बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 78 टक्के 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
काल एका दिवसात महाराष्ट्रात 9,164 रुग्ण बरे झाले. त्याखालोखाल दिल्लीत 7,264 तर केरळमध्ये 7,252 रुग्ण बरे झाले आहेत.
काल नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी 78 टक्के रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
दिल्लीत काल एका दिवसात सर्वाधिक 8,593 नवीन रुग्ण आढळले तर त्या खालोखाल केरळमध्ये 7,007 आणि महाराष्ट्रात 4,907 नवे रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासात 550 मृत्यूची नोंद झाली. मृत्यूदर 1.48 टक्के आहे.
नवीन मृत्यूंपैकी 80 टक्के 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यापैकी महाराष्ट्रात 125 तर दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 85 आणि 49 मृत्यू झाले.
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात बुधवारी 4,907 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली, तर 9,164 रुग्ण बरे झाले. राज्यात सध्या 88,070 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात कोविडमुळे 45,560 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर 2.63 टक्के आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी बुधवारी महाराष्ट्रासह सात राज्यांना विशेषत: ज्या भागात कोविड -19 चे जास्त रुग्ण आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आणि बाजारपेठ व कार्यालयांच्या ठिकाणी अधिकाधिक चाचण्या करण्यावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन त्यांनी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या अभिनव आणि प्रभावी निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांना विमा संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
FACT CHECK





* * *
S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1672362)
Visitor Counter : 255