संरक्षण मंत्रालय
मिशन सागर - II आय.एन.एस. ऐरावत द्वारे जिबूतीला अन्नाची मदत पुरवली जात आहे
Posted On:
12 NOV 2020 1:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2020
सध्या सुरू असलेल्या 'सागर -II या 'मानवतावादी अभियानाअंतर्गत भारतीय नौदलाचे जहाज ऐरावत 10 नोव्हेंबर 2020 रोजी जिबूती बंदरात दाखल झाले. कोविड 19 महामारी आणि नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी केंद्र सरकार मित्र देशांना मदत पुरवत आहे, आणि त्याच अनुषंगाने आय.एन.एस. ऐरावत जिबूतीतील लोकांसाठी अन्नधान्याची मदत घेऊन गेले आहे.
11 नोव्हेंबर 2020 रोजी जिबूती बंदरात ही सामुग्री सुपूर्द करण्यासाठी एक सोहळा आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये जिबुतीच्या सामाजिक कार्य मंत्रालयाच्या महासचिव इफ्रा अली अहमद,यांनी भारताचे जिबूतीमधील राजदूत अशोक कुमार यांच्याकडून अन्नधान्याची मदत स्वीकारली. या समारंभाला कमांडिंग ऑफिसर आयएनएस ऐरावत, कमांडर प्रसन्ना कुमार उपस्थित होते.
मिशन सागर -II हे पंतप्रधानांच्या सागर (सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास) कल्पनेच्या अनुरूप आहे. आणि सागरी क्षेत्रात सर्वप्रथम प्रतिसाद देणारा देश म्हणून भारतीय नौदलासह हिंद महासागरातील एक विश्वासू भागीदार अशी भारताची प्रतिमा असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. या अभियानात भारताने त्याच्या सागरी शेजारी देशाबरोबर संबंधांना महत्त्व दिले आहे आणि विद्यमान नाते आणखी मजबूत केले जात आहे . भारतीय नौदल हे . संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या इतर संस्थांशी जवळून समन्वय साधून ही मोहिम चालवत आहे.
* * *
G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1672239)
Visitor Counter : 191