आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताने सलग 5 व्या दिवशी 50 हजारांहून कमी नवीन रुग्णसंख्या नोंदवली


उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 4.9 लाखांच्या खाली, सक्रिय रुग्णांचे प्रमाण एकूण बाधित रुग्णांच्या 5.63 टक्के

Posted On: 12 NOV 2020 1:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्‍हेंबर 2020

 

देशभरात सलग 5 व्या दिवशी, नवीन रुग्णाची संख्या 50,000 च्या आत राहिली आहे. गेल्या  4 तासात 47,905 नवे बाधित रुग्ण आढळले आहेत.

रुग्ण बरे होण्याची दैनंदिन संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त असण्याचा कल 40 व्या दिवशीही कायम असून गेल्या 24 तासात 52,718 रुग्ण बरे झाले आहेत.

सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 4.98 लाख आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी केवळ 5.63 टक्के रुग्णांवर उपचार सुरु असून ही संख्या  5 लाखांच्या खाली म्हणजेच 4,89,294 इतकी आहे.

नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक असल्याने रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला आहे. सध्या हा दर 92.89 टक्के इतका आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 80,66,501 वर गेली  आहे. बरे झालेले रुग्ण  आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यातील अंतर झपाट्याने वाढत असून 75,77,207 झाले आहे.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 78 टक्के 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

काल एका दिवसात महाराष्ट्रात 9,164 रुग्ण बरे झाले. त्याखालोखाल  दिल्लीत 7,264 तर केरळमध्ये 7,252  रुग्ण बरे झाले आहेत.

काल नव्याने  नोंद झालेल्या रुग्णांपैकी 78 टक्के रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

दिल्लीत काल एका दिवसात सर्वाधिक 8,593 नवीन रुग्ण आढळले तर त्या खालोखाल केरळमध्ये 7,007 आणि महाराष्ट्रात 4,907 नवे रुग्ण आढळले.

गेल्या 24 तासात 550 मृत्यूची नोंद झाली.  मृत्यूदर 1.48 टक्के आहे.

नवीन मृत्यूंपैकी 80 टक्के 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यापैकी महाराष्ट्रात 125 तर  दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 85 आणि 49  मृत्यू झाले.


* * *

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1672228) Visitor Counter : 212