पंतप्रधान कार्यालय
17 व्या आसियान-भारत आभासी शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
Posted On:
12 NOV 2020 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2020
नमस्कार,
मान्यवर, पंतप्रधान नुयेन सुवन फुक,
उपस्थित मान्यवर,
दरवर्षीप्रमाणे आपण हातात हात घेऊन आपला पारंपरिक कौटुंबिक फोटो घेऊ शकलो नाही, मात्र मला याचा आनंद आहे की किमान आभासी माध्यमातून तरी आपण एकमेकांना भेटू शकतो आहोत.
सर्वात आधी आसियानचे सध्याचे अध्यक्ष विएतनाम आणि आसियानमधील भारताचे सध्याचा देश समन्वयक थायलंड या दोघांचेही मी अभिनंदन करतो. कोविडच्या अडचणी असतांना देखील त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडल्या आहेत.
मान्यवर,
भारत आणि आसियान यांच्यातील राजनैतिक भागीदारी आमच्या सामाईक, ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक वारशांच्या अनुबंधांवर आधारलेली आहे. आसियान समूह सुरुवातीपासूनचा आमच्या अॅक्ट इस्ट धोरणाचे मूळ केंद्र राहिले आहे.
भारताचा ‘भारत-प्रशांत महासागर उपक्रम’ आणि आसियान चा ‘आऊटलूक ऑन इंडो-पैसिफिक” यांच्यात अनेक साधर्म्ये आहेत. आमचा असा विश्वास आहे की ‘या प्रदेशातील सर्वांची सुरक्षितता आणि विकास” यासाठी ‘एक संलग्न आणि प्रतिसादात्मक आसियान’आवश्यक आहे.
भारत आणि आसियान यांच्यात सर्व प्रकारचा संपर्क वाढवणे- मग तो प्रत्यक्ष, आर्थिक, सामाजिक, डिजिटल, वित्तीय, किंवा सागरी संपर्क असो, वाढवण्याला आमचे प्राधान्य आहे.
गेल्या काही वर्षात, आम्ही या सर्वच क्षेत्रात अधिकाधिक जवळ आलो आहोत. मला विश्वास आहे की आज आमची ही चर्चा, भले मग ती आभासी माध्यमातून होत असेल, ही चर्चा आमच्यातले अंतर कमी करण्यासाठी लाभदायक ठरेल.
आजच्या या चर्चेसाठी आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो.
* * *
G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1672360)
Visitor Counter : 190
Read this release in:
Hindi
,
Telugu
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Assamese