PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 10 NOV 2020 8:03PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 10 नोव्हेंबर 2020

Coat of arms of India PNG images free download  

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.30 वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील स्वामी विवेकानंदांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील.  केंद्रीय शिक्षणमंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

भारताने सहा दिवसांनतर दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा 40,000 पेक्षा कमी नोंदवला. गेल्या 24 तासांतील नवीन रुग्णसंख्या ही 38,073 एवढी नोंदवली गेली. सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन नव्या केसेस 50,000हून कमी आहेत.

गेल्या तीन-चार दिवसांमध्ये काही देशांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत म्हणजे दैनंदिन 1 लाख एवढे जास्त;  या पार्श्वभूमीवर हे विशेष उल्लेखनीय आहे.

गेल्या काही आठवड्यात सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे.

आज 38व्या दिवशी, बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णसंख्येहूनी वाढली आहे. गेल्या 24 तासात 42,033 जण बरे झाले.

देशातील उपचाराधीन कोविडबाधित रूग्णसंख्या  5,05,265 पर्यंत घसरली आहे.   या उताराला अनुसरून   देशातील एकूण बाधित रूग्णांपैकी उपचाराधीन रुग्ण फक्त 5.88%  एवढे नोंदवले गेले.,

रोगमुक्तीचा दरसुद्धा सातत्याने वाढत 92.64% वर पोहोचला आहे.  आजची रोगमुक्तांची एकूण संख्या 79,59,406 नोंदवली गेली. रोगमुक्तांच्या आणि उपचाराधीनांच्या संख्येतील दरी वाढत 74,54,141 एवढी नोंदवली गेली.

नवीन रुग्णमुक्तांपैकी  78%  केसेस 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

दिल्लीने दैनंदिन रोगमुक्तीत आतापर्यंत सर्वाधिक संख्या म्हणजे 7,014 एवढी संख्या नोंदवली त्य़ानंतर केरळमध्ये 5,983  तर त्या खालोखाल पश्चिम बंगालमध्ये 4,396 आहे.

नवीन बाधितांपैकी 72% बाधित हे 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील.

दिल्लीत सर्वाधिक रुग्णसंख्या म्हणजे 5,983 नवे रुग्ण नोंदवले गेले. ही संख्या कालच्या 7,745 या नव्या रुग्णसंख्येपेक्षा कमी होती, दिल्लीखालोखाल पश्चिम बंगालमध्ये 3,907 नवे रूग्ण नोंदवले गेले. केरळात  दैनंदिन रुग्णसंख्येत घट होऊन ती 3,593 झाली तर महाराष्ट्राचे दैनंदिन रूग्णसंख्येत तिसरे  चौथे स्थान असतानाही  ती 3,277 एवढीच नोंदवली गेली.

गेल्या 24 तासात 448 मृत्यू नोंदवले गेले. सलग दुसऱ्या दिवशी 500 पेक्षा कमी मृत्यू झाल्याने मृत्यूदरातील घसरणीचे सातत्य कायम राहिले.

मृत्यूंपैकी 78% मृत्यू 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त 85 ही मृत्यूंची संख्या असली तरी दैनंदिन मृत्यूदर 18.97% पर्यंत घसरला आहे. त्यानंतर दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 71 आणि 56 मृत्यू झाले.

 

इतर अपडेट्स:

“कोविड-19 शी लढा देण्यासाठी आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या’ या विषयावरील एक विशेष लिफाफा आणि कॅन्सलेशन तिकीटाचे गोवा टपाल कार्यालयाने प्रकाशन केले. पणजी इथल्या टपाल भवनातील मुख्य सभागृहात हा कार्यक्रम झाला. गोवा फिल्टेलिक आणि न्यूमिझमॅटिक सोसायटी- या प्राचीन चलन तसेच टपाल तिकीट संग्राहक संस्थेने हा लिफाफा आणि कॅन्सलेशन पुरस्कृत केला आहे.

केंद्रिय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल `निशंक` यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवत, राष्ट्रीय शिक्षण दिवस (राष्ट्रीय शिक्षा दिवस) कार्यक्रमाचे आभासी माध्यमातून आज उद्घाटन केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (आयआयटी) यांच्या वतीने भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डीआरडीओ-म्हणजेच संरक्षण, संशोधन आणि विकास संघटनेच्या दिल्ली स्थित भवन परिसरात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व डीआरडीओचे संचालक जी सतीश रेड्डी यांच्या उपस्थितीत, ए-सॅट या उपग्रह-रोधी क्षेपणास्त्राच्या मॉडेलचे राष्ट्रार्पण करण्यात आले. देशातले पहिले उपग्रह-रोधी क्षेपणास्त्र, ए-सॅट ची 27 मार्च2019 रोजी ओदिशातील डॉ एपीजे अब्दुल कलाम बेटावर यशवी झाली.

ब्रिक्स सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नसच्या पहिल्या परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहभागी झाल्या होत्या. ब्रिक्सच्या रशियन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही बैठक  झाली. या बैठकीचा मुख्य अजेंडा, जी-20 सौदी प्रेसिडेन्सी-2020 उपक्रमाच्या यशस्वितेवर चर्चा करणे हा होता. नव विकास बँकेच्या सद्स्यतेचा विस्तार आणि पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे.

‘आयटीएटी’ अर्थात प्राप्तीकर अपिलीय न्यायाधिकरणाच्या ओडिशातील कटक खंडपीठाच्या  कार्यालय-सह-निवासी संकुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या करण्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती अपिलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती पी. पी. भटट् यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. उद्या सायंकाळी 4.30 वाजता आभासी स्वरूपामध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

देशातील पहिल्या कोळसा खाणी व्यावसायिक लिलाव प्रक्रीयेच्या ऐतिहासिक यशस्वितेतून राज्यांना 6,656 कोटी रुपये वार्षिक महसूल मिळेल अशी माहिती, केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. ही लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत जोशी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. देशातील 19 खाणींचा लिलाव यशस्वीपणे पूर्ण झाला असून कोळसा लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच खाणींचा लिलाव पूर्ण झाला आहे, असे जोशी यांनी सांगितले.

कोविड-19 मुळे देशभरात लागू असलेल्या टाळेबंदीच्या दीर्घ विरामानंतर पुन्हा शाळेत जाणारे अरुणाचल प्रदेशचे हजारो विद्यार्थी खादी चे तिरंगी मास्क लावून शाळेत येणार आहेत. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने, या विद्यार्थ्यांसाठी अरुणाचल प्रदेश सरकारला 60 हजार उच्च दर्जाचे खादीचे मास्क पुरवले आहेत. येत्या 16 नोव्हेंबरपासून इथल्या शाळा सुरु होणार आहेत.

देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या वेबिनारमधे बोलताना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग सचिव प्रा.आशुतोष शर्मा म्हणाले ,की विज्ञान ,तंत्रज्ञान विभाग (DST)नवनिर्माण,स्टार्ट अप यांच्यावर भर देत नवे रोजगार आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून वेगवान गतीने आणि मापदंडांनी बदलणाऱ्या देशाच्या भविष्यकालीन गरजांसाठी कार्य करत आहे. डीएसटी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सर्वच क्षेत्रांत आपली शक्ती आणि क्षमता विकसित करत आहे.

 

महाराष्ट्र अपडेट्स

कोविड19 रुग्णांच्या संख्येत घट होण्याचा कल महाराष्ट्रात कायम आहे. राज्यात कोविडच्या 3,277 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 23 जून नंतरचा रुग्णासंख्येचा हा नीचांक आहे. मुंबईत 599 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातही सोमवारी 631 नवीन रुग्णांची नोंद झाली.

FACT CHECK

 

Image

*********

S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1671792) Visitor Counter : 176