आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात दैनंदिन रुग्णसंख्या 40,000 पेक्षा कमी


सक्रीय रुग्ण व  मृत्यूंच्या  रोजच्या संख्येतही सातत्याने घट

Posted On: 10 NOV 2020 5:00PM by PIB Mumbai

भारताने सहा दिवसांनतर दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा 40,000 पेक्षा कमी नोंदवला. गेल्या 24 तासांतील नवीन रुग्णसंख्या ही 38,073 एवढी नोंदवली गेली. सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन नव्या केसेस 50,000 हून कमी आहेत.

गेल्या तीन चार दिवसांमध्ये काही देशांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत म्हणजे दैनंदिन 1 लाख एवढे जास्तया पार्श्वभूमीवर हे विशेष उल्लेखनीय आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001UPJT.jpg

गेल्या काही आठवड्यात सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002TFL8.jpg

आज 38व्या दिवशी, बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णसंख्येहूनी वाढली आहे. गेल्या 24 तासात 42,033 जण बरे झाले.

देशातील उपचाराधीन कोविड बाधित  रूग्णसंख्या  5,05,265 पर्यंत घसरली आहे.   या उताराला अनुसरून   देशातील एकूण बाधित रूग्णांपैकी उपचाराधीन रुग्ण फक्त 5.88%  एवढे नोंदवले गेले.,

रोगमुक्तीचा दरसुद्धा सातत्याने वाढत 92.64% वर पोहोचला आहे.  आजची रोगमुक्तांची एकूण संख्या 79,59,406  नोंदवली गेली . रोगमुक्तांच्या आणि उपचाराधीनांच्या संख्येतील दरी वाढत 74,54,141 एवढी नोंदवली गेली.

नवीन रुग्णमुक्तांपैकी  78%  केसेस 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

दिल्लीने दैंनदिन रोगमुक्तीत आतापर्यंत सर्वाधिक संख्या म्हणजे 7,014   एवढी संख्या नोंदवली त्य़ानंतर केरळमध्ये 5,983  तर त्या खालोखाल पश्चिम बंगाल मध्ये 4,396 आहे.

नवीन बाधितांपैकी 72% बाधित हे 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील. 

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003FAJJ.jpg

दिल्लीत सर्वाधिक रुग्णसंख्या म्हणजे 5,983 नवे रुग्ण नोंदवले गेले. ही संख्या कालच्या 7,745 या नव्या रुग्णसंख्येपेक्षा कमी होती, दिल्लीखालोखाल पश्चिम बंगालमध्ये 3,907 नवे रूग्ण नोंदवले गेले. केरळात  दैंनदिन रुग्णसंख्येत घट होऊन ती 3,593 झाली तर महाराष्ट्राचे दैनंदिन रूग्णसंख्येत तिसरे  चौथे स्थान असतानाही  ती 3,277 एवढीच नोंदवली गेली.

 

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004PCKU.jpg

गेल्या 24 तासात 448 मृत्यू नोंदवले गेले. सलग दुसऱ्या दिवशी 500 पेक्षा कमी मृत्यू झाल्याने मृत्यूदरातील घसरणीचे सातत्य कायम राहिले.

मृत्यूंपैकी 78% मृत्यू 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त 85 ही मृत्यूंची संख्या असली तरी दैनंदिन मृत्यूदर 18.97% पर्यंत घसरला आहे. त्यानंतर दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 71 आणि 56 मृत्यू झाले.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005J89Z.jpg

M.Chopade/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1671723) Visitor Counter : 206