अर्थ मंत्रालय

ब्रिक्स सदस्य देशांचे वित्तमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या पहिल्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहभागी

Posted On: 09 NOV 2020 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 नोव्‍हेंबर 2020

 

ब्रिक्स सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नसच्या पहिल्या परिषदेत आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहभागी झाल्या होत्या. ब्रिक्सच्या रशियन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही बैठक  झाली. या बैठकीचा मुख्य अजेंडा, जी-20 सौदी प्रेसिडेन्सी-2020 उपक्रमाच्या यशस्वितेवर चर्चा करणे हा होता. नव विकास बँकेच्या सद्स्यतेचा विस्तार आणि पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे.

सर्व ब्रिक्स  सदस्य राष्ट्रे जी-20 गटाचे सदस्य असून या समूहाने, या वर्षात काही महत्वाचे उपक्रम राबवले आहेत, यात कोविड-19 चा सामना करण्यासाठी जी-20 कृती आराखड्याचा समावेश असून, ज्यातून या संकटातून बाहेर पडण्यासाठी एक सामूहिक जागतिक प्रतिसाद देण्याबाबत दिशा दाखवणारे मार्गदर्शन मिळाले, असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बैठकीत मांडले. त्याशिवाय, जी-20 ऋण सेवा स्थगिती उपक्रमामुळे अल्प उत्पन्न असलेल्या देशांना द्विपक्षीय करारातील कर्जे फेडण्यापासून सवलत मिळाल्यामुळे त्यांच्या तेव्हाच्या रोख पैशांच्या गरजा त्याना पूर्ण करणे शक्य झाले. या उपक्रमांमध्ये अभिप्रेत असल्याप्रमाणे, ब्रिक्स सदस्यांनी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसमोरील चिंता समजून घेत, त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला, असेही त्या म्हणाल्या.

डिजिटल अर्थव्यवस्थेच्या करप्रणालीच्या मुद्द्यावर उपाय शोधण्यासाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या प्रयत्नांविषयी बोलतांना त्या म्हणाल्या, की  याबाबत सर्वसहमतीने तोडगा निघाल्यास, न्याय्य, समान आणि शाश्वत करप्रणाली निर्माण होण्यात मदत होईल.

यावेळी बिक्स सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर्स यांनी एनबीडी म्हणजे नव विकास बँकेच्या सदस्यत्वाचा विस्तार करण्याबाबतही चर्चा केली. निर्मला सीतारामन यांनी या विस्ताराच्या प्रस्तावाला पाठींबा  ते प्रादेशिक समतोल जपण्यावर भर दिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. एक एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याच्या रशियाच्या उपक्रमावरही सीतारामन यांनी आपले मत व्यक्त केले.

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1671541) Visitor Counter : 261